Marathi News> विश्व
Advertisement

Pfizer आणि Moderna पेक्षाही स्वस्त असेल Sputnik-V Corona वॅक्सीन

 रशिया(Russia) च्या स्पुतनिक-V (Sputnik-V) लसीची(Vaccine) किंमत सरकारला फाइजर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) पेक्षा कमी असणार आहे.

Pfizer आणि Moderna पेक्षाही स्वस्त असेल Sputnik-V Corona वॅक्सीन

मॉस्को : जगभरात पसरलेल्या कोरोना वायरसवर प्रभावी असणाऱ्या अनेक लसी शेवटच्या टप्प्यात आल्यायत. आता कोणती लस पहिली येणार ? कोणत्या लसीची काय किंमत असणार ? या चर्चा सुरु आहेत. रशिया(Russia) च्या स्पुतनिक-V (Sputnik-V) लसीची(Vaccine) किंमत सरकारला फाइजर (Pfizer) आणि मॉडर्ना (Moderna) पेक्षा कमी असणार आहे. वॅक्सिनच्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवर रविवारी यासंदर्भात माहिती देण्यात आली. 

फाइझर (Pfizer) ची जाहीर केलेली किंमत ही प्रति डोस १९.५० डॉलर (1446.17 रुपये)  आणि मॉडर्ना (Moderna) ची किंमत २५ ते ३७ डॉलर (1854.07-2744.02 रुपये) ठेवण्यात आली आहे. म्हणजेच एका व्यक्तीच्या हिशोबाने वॅक्सिनची किंमत ३९ डॉलर  (२८९२.३४ रुपये) आणि ५० ते ७४ डॉलर (३७०८.१३-५४८.०४ रुपये) असेल. 

प्रत्येक व्यक्तीस स्पुतनिक (Sputnik-V), फाइजर आणि मॉडर्नाच्या दोन डोसची गरज असेल. स्पुतनिकची किंमत यापेक्षा देखील कमी असेल. 

रशियाच्या वॅक्सिनची किंमत पुढच्या आठवड्यात जाहीर केली जाईल असे रशिया प्रत्यक्ष निवेश कोष (RDIF) च्या प्रवक्तांच्या हवाल्याने न्यूज एजन्सीने म्हटलंय. मोठ्या प्रमाणात परीक्षण करण्याआधी अधिकृत नोंदणी केली तेव्हा ही लस ऑगस्टमध्ये कोरोना वॅक्सिनला स्वीकृती देणारा रशिया पहीला देश बनला. 

Read More