Marathi News> विश्व
Advertisement

महिला पॉर्न कालाकाराने ठोकला डोनाल्ड ट्रम्पवर दावा

महिला पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफोर्ड हिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यायालयात दावा ठोकला आहे. तसेच, कॅलिफोर्नियाच्या न्यायाधिशांकडून २०१६च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काहि दिवस आगोदर करण्यात आलेल्या समझोत्यांवर केलेल्या बेकायदेशीर स्वाक्षऱ्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

महिला पॉर्न कालाकाराने ठोकला डोनाल्ड ट्रम्पवर दावा

लॉस एंजिलिस : महिला पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफोर्ड हिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यायालयात दावा ठोकला आहे. तसेच, कॅलिफोर्नियाच्या न्यायाधिशांकडून २०१६च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काहि दिवस आगोदर करण्यात आलेल्या समझोत्यांवर केलेल्या बेकायदेशीर स्वाक्षऱ्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

शरीरसंबंध असल्याचा केला होता दावा

लॉस एंजिलिसमध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यात आरोप करण्यात आला आहे की, संबंधीत समझोता बेकायदेशी आणि प्रभावहिन आहे. कारण, या समझोत्यावर ट्रम्प यांनी स्वत:ही सही केली नाही. स्टेफनी क्लिफोर्ड उर्फ स्टॉर्मी डॅनियल हिने दावा केला होता की, ट्रम्प आणि तिच्यात शारीरिक संबंध होते. तसेच, दोघांमध्ये काही काळ एक नातेही होते. मात्र, ट्रम्प यांच्या वकिलाने या संबंधाचा दावा फेटाळून लावला होता.

ट्रम्प यांनी धमकी दिल्याचाही आरोप

ट्रम्पचे वकील, मायकेल कोहोन यांनी म्हटले होते की, त्यांनी पॉर्नस्टारला समझोत्यापोटी १ लख ३० हजार डॉलर दिले होते. त्यांनी म्हटले होते की, ट्रम्प यांचे अशा प्रकारचे कोणतेही संबंध नव्हते. दरम्यान, याच खटल्यात स्टेफनीने आपले तोंड बंद ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून आपल्याला धमकीही आली होती असा आरोप केला होता.

Read More