Marathi News> विश्व
Advertisement

हे आहेत नेपाळचे अंबानी; भारतात ठिकठिकाणी विकलं जातं त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट, श्रीमंतीचा आकडा पाहाच...

Success Story Latest News : कोण आहे ही व्यक्ती? त्यांचं नाव काय? जगभरात त्यांच्याही श्रीमंतीही होते चर्चा. नेपाळचे अंबानी म्हणून आहेत प्रसिद्ध....

हे आहेत नेपाळचे अंबानी; भारतात ठिकठिकाणी विकलं जातं त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट, श्रीमंतीचा आकडा पाहाच...

Success Story Latest News : जगातील श्रीमंतांचा जेव्हाजेव्हा विषय निघतो तेव्हातेव्हा काही नावं हमखास समोर येतात. अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला... अगदी जागतिक स्तरावर उल्लेख करावा तर मार्क झुकरबर्ग, एलॉन मस्क, जेफ बेजोस आणि बरीच मंडळी या यादीत येतात. याच यादीत एक नाव असंही आहे जे अग्रस्थानी नसलं तरीही त्यांच्या देशात मात्र त्यांची श्रीमंती इतकी जास्त आहे की पाहणारेही अवाक् होतात. यांना काही मंडळी तर दुसरे अंबानी असंही म्हणतात.

ही व्यक्ती म्हणजे भारताचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या नेपाळ या देशातील सर्वात धनाढ्य व्यक्ती बिनोद चौधरी. (Binod Chaudhary) असं म्हणतात की बिनोद चौधरी हे त्यांच्या देशातील म्हणजेच नेपाळीमधील एकुलते एक अब्जाधीश आहेत. अतिशय लहानशा उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ज्यानंतर टप्प्याटप्प्यानं त्यांनी यश मिळवत उत्तुंग शिखर गाठलं आणि आपलं वेगळं अस्तित्वं तयार केलं.

चौधरी यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक कंपन्या सुरु झाल्या. त्यांचीच कंपनी एक असं प्रोडक्ट बनवते, जे फक्त नेपाळच नव्हे तर भारतातही गल्लीबोळातील दुकानांपासून अगदी मॉलपर्यंतच्या दुकानांमध्येही विकलं जातं. हे प्रोडक्ट म्हणजे मॅगीला टक्कर देणारे ‘वाय वाय नूडल्स’. फोर्ब्सच्या माहितीनुसार चौधरी यांच्या एकूण श्रीमंतीचा आकडा आहे 15,025 कोटी रुपये.

चौधरी यांच्या श्रीमंतीचा आकडा अंबानी आणि अदानींइतका मोठा नसला तरीही त्यांनी संपादन केलेलं यश आणि आपल्या देशात त्यांनी केलेली प्रगती मात्र उल्लेखनीय आहे. त्यांचा जन्म काठमांडूतील एका मारवाडी कुटुंबात झाला होता. चौधरी यांच्या आजोबांनी भारतात येऊन इथं कापड उद्योगामध्ये चांगलाच जम बसवला होता. ज्यानंतर त्यांच्या वडिलांनी हा व्यवसाय पुढे नेला. जेआरडी टाटा यांना चौधरी यांनी आदर्शस्थानी ठेवलं होतं.

वाय वाय नूडल्सच्या जन्माची कहाणी...

चौधरी थायलंडला गेले असता तिथं इंन्स्टंट नूडल्सप्रती असणारं वेड पाहून ते थक्क झाले आणि त्यांनी नेपाळमध्ये हा व्यवसाय सुरु करण्याचा पर्याय चाचपडून पाहिला... आणि मग जन्म झाला वाय वाय नूडल्सचा. नेपाळच्या घराघरात त्यांच्याच कंपनीचे नूडल्स विकले जाऊ लागले. इतक्यावरच न थांबता चौधरी यांनी उद्योगक्षेत्रातील विविध विभागांमध्ये नशीब आजमावलंय. अखेर वडिलांच्या आरोग्यविषय समस्यांमुळं त्यांनी कौटुंबीक व्यवसायाची धुरा आपल्या हाती घेतली आणि नेपाळमधील उद्योगजगतात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

नेपाळमध्ये आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावत असतानाच समाजकार्यात ते मागे राहिले नाहीत. 2015 मध्ये इथं आलेल्या भूकंपानंतर त्यांनी सामान्यांच्या मदतीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. शाळा आणि घरांच्या पुनर्बांधणीसाठी हातभार लावला आणि जनमानसातही आपलं एक खास स्थान नकळतच निर्माण केलं.

Read More