Sunita Williams Return on Tuesday saya NASA : बोईंग स्टारलायनरमध्ये झालेल्या काही तांत्रिक अडचणींमुळे नासाच्या वतीनं अवकाशात गेलेल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर सुनीता विलियम्स तिथंच अडकल्या. काही आठवड्यांचा त्यांचा हा मुक्काम पाहता पाहता तब्बल 9 महिन्यांपर्यंत पोहोचला आणि अखेर नासासह स्पेसएक्स, अमेरिकी सरकारच्या प्रयत्नांतून आता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर पृथ्वीवर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत.
विल्मोर आणि विलियम्स हे दोघंही मंगळवारी पृथ्वीवर पाऊल ठेवतील असं नासाकडून (NASA) नुकतंच जारी करण्यात आलेल्या माहितीमध्ये म्हटलं गेलं आहे. मंगळवारी सायंकाळी या दोन्ही अंतराळवीरांना फ्लोरिडा येथील समुद्रकिनाऱ्यावर अंतराळयानातून सुरक्षितरित्या उतरवलं जाणार आहे.
स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन कॅप्सुलच्या मदकीनं त्यांना पृथ्वीवर परत आणलं जाणार असून त्यांच्यासोबत यावेळी अमेरिकी अंतराळवीर निक हेग आणि रशियन अंतराळवीर कॉस्मोनॉट अलेक्जेंडर गोर्बूनोव हेसुद्धा पृथ्वीवर परतणार आहेत.
.@NASA will provide live coverage of Crew-9’s return to Earth from the @Space_Station, beginning with @SpaceX Dragon hatch closure preparations at 10:45pm ET Monday, March 17.
— NASA Commercial Crew (@Commercial_Crew) March 16, 2025
Splashdown is slated for approximately 5:57pm Tuesday, March 18: https://t.co/yABLg20tKX pic.twitter.com/alujSplsHm
Watch the @SpaceX #Crew10 members enter the space station and join the Exp 72 crew for a long-duration space research mission. https://t.co/WHpxBz51Ts https://t.co/WHpxBz51Ts
— International Space Station (@Space_Station) March 16, 2025
नासाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार याआधी ही मोहिम बुधवारी पार पडणार होती. पण, हवामान बदलांमुळं आता एक दिवस आधी म्हणजेच मंगळवारी विलियम्स पृथ्वीवर परततील. अमेरिकी प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 5.57 वाजता (2157 GMT) हे अंतराळयात्री पृथ्वीवर पाऊल ठेवतील आणि ही संपूर्ण मोहिम, हे क्षण सारं जग Live Telecast च्या माध्यमातून पाहू शकणार आहे. तेव्हा आता सुनीता विलियम्स आणि त्यांच्यासोबतचे अंतराळयात्री पृथ्वीवर पाऊल कसं ठेवतात आणि त्यांची यानंतरही प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.