Marathi News> विश्व
Advertisement

kabul Blast: रुग्णालयाबाहेर भीषण बॉम्बस्फोट, 15 जणांचा मृत्यू; 34 जखमी

या स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली आहे. 

kabul Blast: रुग्णालयाबाहेर भीषण बॉम्बस्फोट, 15 जणांचा मृत्यू; 34 जखमी

काबुल: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर तिथली परिस्थिती काही फार बरी आहे असं नाही. आता एक मोठी अपडेट येत आहे. आफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिलिटरी हॉस्पिटलसमोर बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. 

या स्फोटानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गोळीबाराचा आवाज येत असल्याची माहिती मिळाली आहे. तालिबान सत्तेवर आल्यापासून अफगाणिस्तान अधिक अशांत झाला असल्याचं दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. 

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंगळवारी अफगाणिस्तानच्या राजधानीतील लष्करी रुग्णालयाबाहेर स्फोटाचा आवाज ऐकू आला. एकदा नाही तर दोनवेळा स्फोटाचे आवाज ऐकू आले. इतकच नाही तर रुग्णालयाबाहेर गोळीबाराचे आवाज देखील ऐकू आल्याचं तिथल्या लोकांनी सांगितलं आहे. यामुळे तिथल्या परिसरात तणावाचं आणि भीतीचं वातावरण आहे. 

या स्फोटात 15 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून 34 जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. 

Read More