Marathi News> विश्व
Advertisement

20 बायका, 104 मुले; वडिलांची 'ती' इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मुलांची फौज वाढवली; इच्छा जाणून शॉक व्हाल

20 महिलांशी लग्न करुन 104 मुलांना जन्माला घालून स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?

20 बायका, 104 मुले; वडिलांची 'ती' इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याने मुलांची फौज वाढवली; इच्छा जाणून शॉक व्हाल

Man Married to 20 Wives : आपल्या मुलांचे वेळेत लग्न व्हावे नातवंडाना खेळवावे अशी सर्वच आई वडिलांची इच्छा असते. मात्र, एका व्यक्तीने वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी  एक दोन नाही तर 20 लग्न केली. या वक्तीने  तब्बल 104 मुले जन्माला घातली. जाणून घेऊया  20 महिलांशी लग्न करुन 104 मुलांना जन्माला घालून स्वत:चे साम्राज्य निर्माण करणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?

म्झी अर्नेस्टो मुइनुची कपिंगा असे 20 महिलांचा पती असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कपिंगा हा टांझानियातील न्जोम्बे या छोट्याशा गावात राहतो. कपिंगा याला 104 मुले आणि 144 नातवंडे आहेत. कपिंगाने 20 वेळा लग्न केले आहे. यापैकी त्याच्या चार पत्नींचे निधन झाले आहे. सध्या त्याच्या 16 बायका जिवंत आहेत. 

पल्स आफ्रिकाने कपिंगाची स्टोरी सांगितली आहे. कपिंगा हा आदिवासी जमातीचा आहे. जमातीचा लोकसंख्या वाढवण्यासाठी जास्तीत जास्त लग्न करुन जास्तीत मुलांना जन्म द्यावा अशी इच्छा कपिंगाच्या वडिलांनी व्यक्त केली. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कपिंगाने 20 महिलांशी लग्न केले आणि तब्बल 104 मुलांना जन्म घातली. कपिंगा याच्या मुलांनाही मुले झाली आहेत. कपिंगा याला 144 पेक्षा जास्त नातवंड आहे. कपिंगा याच्या कुटुंबात सध्या 250 पेक्षा जास्त लोक आहेत.

1961 मध्ये जेव्हा अनेक आफ्रिकन देश स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होते, तेव्हा कपिंगाने आपल्या कुटुंबाचा विस्तार करण्यावर लक्ष केंद्रित केले. 1962 मध्ये  कपिंगाच्या पहिल्या मुलाचा जन्म  झाला. यानंतर त्याने  104 मुलांना जन्माला घातले.  आफ्रिमॅक्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने त्याच्या कुटुंबाची माहिती दिली. 

कपिंगाचे संपूर्ण कुटुंब शेती आणि जनावरांचे संगोपन करते. शेता आणि पशुपालन हेच त्याच्या कुटुंबाच्या उपजिवीकेचे साधन आहे. सर्व बायका या कुंटुंब एकत्र ठेवतात. इतकी मुलं आणि नातवंड आहेत की सर्वाची नावे लक्षात राहत नाहीत असे कपिंगाने मुलाखतीत सांगितले. 

Read More