बर्मिंगहॅम कसोटी क्रिकेटच्या दुस-या दिवशी भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं.. भारताच्या 587 धावांचा पाठलाग करणा-या इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. आकाश दीप आणि मोहम्मद सिराजनं इंग्लंडच्या पहिल्या फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. दुस-या दिवसअखेर इंग्लंडनं 3 बाद 77 धावांपर्यंत मजल मारलीय. तत्पूर्वी दुसरा दिवस ख-या अर्थानं गाजवला तो भारतानं. शुभमन गिलच्या 269 धावांच्या वादळी खेळीसमोर इंग्लंड भेदरला. गिलनं आपल्या कसोटी कारकीर्दीमधलं पहिलं द्विशतकं झळकावलं.. गिलच्या तुफानी द्विशतकी खेळीच्या जोरावर भारतानं पहिल्या सत्रामध्ये 587 धावांचा डोंगर उभारला. गिलनं आधी रवींद्र जाडेजासोबत आणि नंतर वॉशिंग्टन सुंदरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली. सध्या इंग्लंड अजूनही 510 धावांनी पिछाडीवर आहे.. त्यामुळे भारत आज मैदानात इंग्लंडच्या फलंदाजांना झटपट बाद करुन फॉलोऑन देण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल.