Marathi News> विश्व
Advertisement

लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर गोंधळ

लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी

तेहरान : इराणमधील अहवाज शहरात शनिवारी लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले असून 20 जवान जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. मोटरसायकलवरून हे दोन्ही हल्लेखोर आले होते. त्यांनी अचानक संचलनावर गोळीबार सुरु केला.

सरकारने या हल्लेखोरांची छायाचित्रे जारी केले असून त्यांचा शोध सुरु केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. ज्यामुळे हल्लेखोर फरार होण्यात यशस्वी ठरले. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनांनी स्विकारलेली नाही.

इराणमध्ये 7 जून 2017 ला संसदेवर देखील हल्ला झाला होता. इराणचे धार्मिक नेते आयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकावरही इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

Read More