Marathi News> विश्व
Advertisement

ही सलूनची जाहिरात की आणखी काही... , पाहूनच एकच खळबळ

जाहिरातही अशी की ती पाहणाऱ्यांना हादराच बसला. यामध्ये एक अतिशय कमी कपडे घातलेली महिला पुरुषाचे केस कापताना दिसली.   

ही सलूनची जाहिरात की आणखी काही... , पाहूनच एकच खळबळ

मुंबई : सहसा जाहिराती या अमुक एका उत्पादन किंवा गोष्टीच्या सर्वाधिक खप होण्यासाठी किंवा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केला जातो. पण, सध्या अशी एक जाहिरात साकारली गेली, जी पाहून अनेकांनाच प्रश्न पडला, की हे नेमकं काय, हाच प्रश्न पडला. 

सोशल मीडियावर सध्या ही जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. ही जाहिरात आहे, थायलवंडमधील नाखोन सावन सिटी येथील ‘रियल कट 4’ नावाच्या दुकानानं त्यांच्या जाहिरातीचे काही फोटो प्रसिद्ध केले. 

जाहिरातही अशी की ती पाहणाऱ्यांना हादराच बसला. यामध्ये एक अतिशय कमी कपडे घातलेली महिला पुरुषाचे केस कापताना दिसली. 

आता ती नेमकी केस कापतेय की आणखी काय करतेय हेच नेमकं फोटो पाहताना लक्षात येत नाहीये. त्यामुळे नेमकं सांगायचंय काय हाच प्रश्न पाहणारे विचारत आहेत. 

अनेकांनी तर ही जाहिरात पाहताना, अशाही चर्चा सुरु केल्या की, हा थायलंडमधील कुंटणखाना आहे.  कोणाला वाटलं हे मसाज पार्लर आहे. पण, हे सलून आहे हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही. 

सर्व गोंधळ सुरु झाल्यानंतर अखेर या सलूनकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. सलूनमध्ये महिला आणि पुरुष दोघंही काम करतात. तसंच फोटोमध्ये दिसणारे हे आमचे मालक असल्याचंही सांगण्यात आलं. 

Read More