Marathi News> विश्व
Advertisement

जगातील एकमेव देश, जिथे शोधूनही सापडत नाहीत मच्छर, साप आणि सरपटणारे प्राणी

जगात असा एक देश आहे जिथे तलाव आणि नाले असले तरी साप, मच्छर आणि इतर कोणतेही सरपटणारे प्राणी आढळत नाहीत. या देशाला सापमुक्त देश म्हटले जाते. 

जगातील एकमेव देश, जिथे शोधूनही सापडत नाहीत मच्छर, साप आणि सरपटणारे प्राणी

Trending News : जगातील एकमेव देश जिथे तलाव आणि नाले असून देखील कधीच सापडत नाही डास, साप आणि सरपटणारे कोणतेही प्राणी. मोठ्या प्रमाणात तिथे प्राण्याची संख्या असून देखील तरी तिथे डास आढळत नाही. म्हणूनच या देशाला सापमुक्त देश असे म्हटले जाते. कबीर दासजी यांच्या मते, 84 लाख प्रजातींमध्ये एक जीव जन्म घेतो आणि मरतो. जसे नाल्यात किडे येतात आणि जातात. आइसलँड असा एक देश आहे जिथे एकही डास नाही. 

तुम्ही देखील हे वाचून हैराण व्हाल की असे कसे होऊ शकते की देशात एकही डास नाही. तर तुम्ही हे सुद्धा जाणून घ्या की, अटलांटिक महासागरच्या जवळ असणाऱ्या आइसलँडमध्ये डास, साप आणि सरपटणारे प्राणी दिसत नाहीत. यामुळेच आइसलँडला सापमुक्त देश असे म्हटले जाते. तिथे तलाव आहे. नाले आहेत. तिथे 1300 प्रकारचे वेगवेगळे प्राणी आढळतात. मात्र, तिथे एकही डास सापडत नाही. तुम्ही देखील विचार करा की, आपण काम न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कधी-कधी म्हणतो की डास मारत बसला आहे का? तसे आइसलँडचे लोग डास मारत बसतात का? असं आपण त्यांना म्हणून शकतो. 

 का नाहीत तिथे डास? 

दरम्यान, आइसलँडमध्ये डास का नाहीत यामागचे कारण काय? डास हे नेहमी साचलेल्या पाण्यात वाढतात. त्या ठिकाणीची त्यांची अंडी ही अळ्यांमध्ये बदलतात. त्यासाठी त्यांना योग्य तापमानाची देखील गरज असते. आइसलँडमधील परिस्थिती अशी आहे की साचलेले पाणी येथे जास्त काळ राहत नाही. येथील ड्रेनेज सिस्टीम अशी आहे की ते कमी वेळात बाहेर पडते. कमी लोकसंख्येमुळे, घरांमध्येही डासांसाठी अनुकूल परिस्थिती नाही. त्यामुळे येथे डास वाढू शकत नाहीत. आइसलँडमधील तापमान खूप कमी आहे. येथील तापमान 38 अंश सेल्सिअसपर्यंत देखील जाते. त्यामुळे तिथे डासांना वाढणे किंवा जगणे अशक्य होते. परंतु, तिथे डासासारखा दिसणारा एक प्राणी आहे. मात्र, तो डासांपेक्षा खूप वेळगा दिसतो. 

या देशांमध्ये आहेत सर्वात जास्त डास 

आश्चर्याची गोष्ट म्हणजे डेन्मार्क, ग्रीनलँड आणि स्कॉटलंड सारखे शेजारील देश डासांनी भरलेले आहेत. त्यामुळे तिथे असा प्रश्न निर्माण होतो की कोणत्या देशांमध्ये सर्वात जास्त डास आढळतात. तर अशा देशांमध्ये ब्राझील, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, फिलीपिन्स आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांचा समावेश आहे. जर आपण भारताबद्दल बोलायचं म्हटलं तर आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिशा सारख्या राज्यात सर्वाधिक डास आढळतात. ज्याप्रमाणे पानिपतला माशांचे शहर म्हटले जाते त्याच प्रमाणे बेंगळुरूला डासांचे शहर म्हटले जाते. भारतातील सर्वात स्वच्छ शहरांमध्ये इंदूर पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु, येथेही डासांपासून मुक्तता नाही. कोटा, भोपाळ, पटना आणि लखनऊ सारख्या शहरांमध्ये डासांची संख्या खूप वाढली आहे.

Read More