सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडलेत. तर अन्य हिरे-मोत्यांचे दरही वाढत चाललेत. तरीदेखील जगात लाखो-करोडो दागिन्यांची उलाढाल दररोज होत असते. पण तुम्हाला माहितीये का सोन्या-चांदीच्या दरांहून अधिक महाग एका दगडाची किंमत आहे. हे ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही. पण आम्ही तुम्हाला अशा एका दगडाबाबत सांगणार आहोत ज्याची खरेदी करणे खूपच आव्हानात्मक आहे. इतकंच नव्हे तर त्याची किंमतही करोडोंच्या घरात आहे.
आम्ही ज्या दगडाबाबत सांगणार आहोत त्याची किंमत सोनं-चांदीतर सोडाच पण पाचू आणि हिऱ्यापेक्षाही महाग आहे. न्यूयॉर्कमध्ये हा दगड विक्रीसाठी उपलब्ध असून ज्याची विक्री 37 कोटींमध्ये करण्यात आली आहे. हा काही सर्वसामान्य दगड नसून याला चमत्कारी दगडदेखील म्हणू शकतात. त्यासाठीच याच्या खरेदीसाठी लांबच लांब रांगा लागतात.
मंगळ ग्रहावरुन दा दुर्मिळ ग्रह आणण्यात आला आहे. याचा लिलाव Sotheby’s ऑक्शन हाउसकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला या दगडाची बोली 2-3 मिलियन डॉलर लावली जात होती. शेवटी 4.3 मिलियन डॉलर जवळपास 37 कोटींपर्यंत या दगडाची बोली लावण्यात आली. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग, इतिहास, तिथली सजीवसृष्टी यांच्या संशोधनासाठी वैज्ञानिकांकडून या दगडाचा वापर केला जातो.
मंगळ ग्रहावरुन आलेल्या या दगडाचे नाव NWA 16788 असून त्याला अद्भूत उल्कापिंड असं म्हटलं जातं. गेल्या काही दिवसांपासून या दगडाची चर्चा आहे. दिसायला खूप भक्कम आणि वजनदेखील खूप असल्याचे सांगितले जाते. या दगडाची एकूण वजन 54 पाउंड (24.5 किलोग्रॅम) इतके आहे. जो जवळपास 15 इंच लांबीला आहे. पृथ्वीवरील धडकलेल्या एकूण 400 मार्टियम उकापिंडमधून NWA 16788 वजनाने भक्कम असल्याचे दिसून आले आहे.
नोव्हेंबर 2023 मध्ये आफ्रिकेतील नायजरमध्ये हा दुर्मिळ दगड दिसला. या दगडाने संशोधकांना आकर्षित केले आणि जेव्हा तज्ञांनी त्याचा सखोल अभ्यास केला तेव्हा त्यांना आढळले की हा दगड प्रत्यक्षात मंगळावरून आला आहे. यानंतर, असा अंदाज लावला जात होता की तो उल्कापिंडाच्या टक्करमुळे तुटला आणि पृथ्वीवर पडला.