Marathi News> विश्व
Advertisement

एकदम खतरनाक! कितीही भारी विमान असलं तरी इथून उड्डाण करताना गदागदा हलतं; प्रवाशांना फुटतो घाम

Aviation news: गेल्या काही महिन्यांमध्ये विमान प्रवासादरम्यान घडलेल्या अनेक अप्रिय घटनांमुळं बऱ्याच प्रवाशांच्या मनात या प्रवासमार्गाविषयीच दुमत झाल्याचं पाहायला मिळत आहे.   

एकदम खतरनाक! कितीही भारी विमान असलं तरी इथून उड्डाण करताना गदागदा हलतं; प्रवाशांना फुटतो घाम

Air travel safety : यंदाच्या वर्षी काही असे भीषण विमान अपघात झाले, ज्यांमुळं असंख्य प्रवाशांच्या मनात आता विमान प्रवास म्हटलं की भीतीसुद्धा घर करून जाते. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाचा झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर प्रवाशांचा ओढावलेला मृत्यू या घटनेनं सारा देश हादरला. 

अतिशय भयावह अशा या अपघातानंतर लागोपाठ जगभरातून विमान दुर्घटना, किंवा तत्सम घटनांची वृत्त समोर आली आणि विमान प्रवासासंदर्भात प्रवाशांच्या मनातील ही भीती मोठी होत गेली. सातत्यानं होणाऱ्या आपात्कालीन लँडिगच्या घटनासुद्धा अतीव प्रमाणात वाढल्यानं विमान प्रवासाचं नाव घेतलं तरी अनेकांनाच धडकी भरते हीच वस्तूस्थिती. 

नुकतीच घडलेली घटना पाहूनही चिंतेत भर पडतेय... 

नुकत्याच घडलेल्या एका घटनेचा संदर्भ पाहिल्यास काही दिवसांपूर्वीच सॉल्ट लेक सिटीहून अॅम्स्टरडॅमला जाणाऱ्या डेल्टा एअरलाईनच्या विमानाचा इतका भयंकर टर्ब्युलन्स मिळाला, की विमान हवेतल्या हवेत जोरानं हलण्यास सुरुवात झाली, हा प्रकार इतका घाबरवणारा होता, की प्रवाशांनी समोर मृत्यूच पाहिला. 

जीव वाचेल असं वाटलंही नव्हतं... 

आता काही खरं नाही, सगळं संपलं... या अशा नकारात्मक भावना प्रवाशांच्या मनात घर करून गेल्या. विमानात पूर्ण वेळ प्रचंड उलथापालथ माजली, लोक जागचे खाली पडले. सर्विस कार्ट केबिनमध्ये इतरत्र पडल्या. एका प्रवाशानं हा प्रसंग म्हणजे एक भूकंपच होता, अशा शब्दांत त्या घटनेचं वर्णन केलं. 

 विमानाला लागलेला टर्ब्युलन्स इतक्या भीषण स्वरुपातील असल्यासं सांगितलं की, मिनियापोलीस इथं विमानाचं आपात्कालीन लँडिंग करत 25 प्रवाशांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हा झाला एका प्रसंगाचा मुद्दा. मात्र विमान प्रवासाच्या आतापर्तच्या इतिहासात अनेकदा असे भयंकर प्रसंग ओढावले असून बऱ्याचदा वैमानिकांच्या कौशल्यानं शेकडो प्रवाशांचा जीव वाचला आहे ही बाब नाकारता येत नाही. 

सर्वात वाईट हवाई मार्ग कोणता? 

CNN च्या माहितीनुसार आभाळात येणाऱ्या या टर्ब्युलन्स किंवा तत्सम परिस्थितीविषयी पूर्वानुमान लावणं तसं कठीणच. असं असलं तरीसुद्धा टर्बली नावाच्या संकेतस्थळानं राष्ट्रीय महासागरीय आणि वातावरणीय प्रशासनासह युके वेधशाळेच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पृथ्वीवरील सर्वात अशांत विमान मार्ग कोणता याचं विश्लेषण केलं. ज्यासाठी 10000 हून जास्त विमान प्रवास मार्गांचं विश्लेषण करण्यात आलं आणि एक धक्कादायक बाब समोर आली. 

टर्बलीचे संस्थापक आणि कम्प्यूटेशनल फ्लूईड डायनामिक्सचे तज्ज्ञ इग्नासियो गॅलेगो मार्कोस याच्या महितीनुसार टर्ब्युलन्ससुद्धा काही Pattern किंवा निकषांचं पालन करतात. अर्जेंटिनाच्या मेंडोडा आणि चिलीच्या सँटियागोदरम्यान 120 मैलांचा असा मार्ग आहे, जिथं एंडिज पर्वताची उंची आणि काही प्रसंगी बर्फाच्छादित हिमशिखरांमुळं विमानप्रवासात व्यत्यय येतो आणि टर्बलीच्या माहितीनुसार हा जगातील सर्वात अशांत हवाई मार्ग आहे. 

विज्ञान काय सांगतं? 

प्रचंड उंचीच्या पर्वतरांगा विमानासाठी धोकादायक असून अनेकदा या नैसर्गिक रचनांमुळं हवेचा प्रवाह बदलतो आणि अनेकदा त्यापासून शेकडो मैल जातील इतक्या ताकदीचे वायुतरंग निर्माण होतात. जेव्हा हे वायुतरंग खंडित होतात तेव्हा प्रचंड अशांतता अर्थाच हवेतील हालचालींना वाव मिळतो आणि साधारण समुद्रातील लाटा फेसाळतात असंच काहीचं चित्र तयार होतं. 

जगातील अशा विमानाला हेलकावे देणाऱ्या हवाई मार्गांविषयी सांगावं तर त्यामध्ये बहुतांश पर्वतरांगांचा समावेश असून त्यात एंडील ही पृथ्वीवरील सर्वाधिक लांबीची पर्वतरांह, हिमालय पर्वतरांग, रॉकी पर्वतरांग, आल्प्स पर्वतरांग या मार्गांचा समावेश आहे. 

FAQ

टर्ब्युलन्समुळे विमानाला आपात्कालीन लँडिंग करावं लागलं का?
होय, मिनियापोलीस इथं एका विमानाला भीषण टर्ब्युलन्समुळे आपात्कालीन लँडिंग करावं लागलं आणि 25 प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

विमान प्रवासात टर्ब्युलन्सचा इतिहास कसा आहे?
विमान प्रवासाच्या इतिहासात अनेकदा भयंकर टर्ब्युलन्सचे प्रसंग आले असून, वैमानिकांच्या कौशल्यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला आहे.

जगातील सर्वात अशांत हवाई मार्ग कोणता आहे?
टर्बलीच्या विश्लेषणानुसार, अर्जेंटिनाच्या मेंडोडा आणि चिलीच्या सँटियागोदरम्यानचा 120 मैलांचा मार्ग, ज्यावर एंडिज पर्वतामुळे टर्ब्युलन्स जास्त आहे, हा जगातील सर्वात अशांत हवाई मार्ग आहे.

Read More