Marathi News> विश्व
Advertisement

अनेक फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी घेत मगरीच्या शिकारीचा थरारक Video

crocodile vs jaguar : हा व्हिडिओ होतोय व्हायरल

अनेक फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी घेत मगरीच्या शिकारीचा थरारक Video

मुंबई : वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. सध्या बिबट्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या पाण्यात उडी मारून मगरीची शिकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहाल.

मगर हा पाण्यातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की मगर पाण्यासोबत जमिनीवरही अनेकदा शिकार करते, मात्र या व्हिडिओमध्ये बिबट्या पाण्यात घुसून मगरीची शिकार करतो. उंचावरून मगरीवर ज्या प्रकारे हल्ला करतो, ते पाहणे खूपच रोमांचक आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक मगर नदीत पोहत आहे. त्याच वेळी, बिबट्या आपल्या शिकारीची वाट पाहत आहे. बिबट्या अनेक फूट उंचीवरून थेट पाण्यात उडी मारतो. मगरीला जगण्याची अजिबात संधी मिळत नाही. 

मगरीला त्याच्या मजबूत दातांनी पकडून जॅग्वार तिला जंगलाच्या दिशेने घेऊन जातो हे तुम्ही पाहू शकता. व्हिडिओमध्ये जॅग्वार ज्या पद्धतीने मगरीसोबत जंगलाकडे जाताना दिसत आहे, त्यावरून जग्वारने अगदी अचूकपणे मगरीवर हल्ला करून त्याची शिकार केल्याचं दिसतं माहिती आहे. EXODOR नावाच्या YouTube चॅनलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत २ कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

Read More