Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग

संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर फिरते. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा घडाळ्याचे काटे फिरवले जातात. 

अमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग

US America Time Zone : पृथ्वी एका काल्पनिक ध्रुवावर फिरते ज्याला त्याचा अक्ष म्हणतात. दर 24 तासांनी, पृथ्वी आपल्या अक्षावर एक संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वी फिरत असताना, पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात सूर्यप्रकाश किंवा अंधार असतो. यामुळेट दिवस आणि रात्र अनुभवता येते. यामुळेच पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे टाईम झोन आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा  घडाळ्याचे टाईमिंग बदलतात. अमेरिका आणि युरोपमध्ये वेळ एक तास मागे जातो (daylight save time). 

5 नोव्हेंबरला घड्याळाची वेळ बदलणार

अमेरिका, कॅनडा, क्युबासह युरोपातील अनेक देशांमध्ये वेळ एक तास मागे जाणार आहे. या देशांमध्ये 5 नोव्हेंबरला घड्याळाची वेळ बदलून वेळ 1 तास मागे घेतला जाणार आहे. 

डेलाइट सेव्हिंग टाइम

या वेळ बदलण्याच्या प्रक्रियेला डेलाइट सेव्हिंग टाइम असं म्हणतात. सर्वप्रथम बेंजामिन फ्रँकलिन यांनी 1784 मध्ये डेलाइट सेव्हिंग टाइमची कॉन्सेप्ट आणली. सध्याची संकल्पना न्यूझीलंडच्या कीटकशास्त्रज्ञ जॉर्ज हडसन यांची आहे. जॉर्ज हडसन यांनी 1895 मध्ये वेळ दोन तासांनी पुढे आणि मागे घेण्याचा प्रस्ताव दिला होता. उन्हाळ्यात जास्त थोडा वेळ घालवता यावा हा त्याचा उद्देश होता.

का केले जातात डेलाइट सेव्हिंग टाइममध्ये बदल

डेलाइट सेव्हिंग टाइम ही संकल्पनाही पहिल्या महायुद्धाच्या काळात स्वीकारली गेली. यामुळे लोक जास्त वेळ घराबाहेर राहतात. सुरुवातीला डेलाइट सेव्हिंग फक्त उन्हाळ्यात होत असे. पण नंतर हिवाळ्यातही केले जाऊ लागले. उन्हाळ्यात वेळ एक तासाने वाढतो आणि हिवाळ्यात हाच वेळ एक तास मागे घेतला जातो.

घड्याळाचे काटे एक तास मागे फिरवणार

अमेरिकेतील डेलाइट सेव्हिंग टाइम 5 नोव्हेंबर रोजी पहाटे 2 वाजता संपत आहे. यानंतर घड्याळाचे काटे एक तास मागे फिरवले जाणार आहेत. यूके आणि इतर युरोपीय देशांमध्ये 29 ऑक्टोबरलाच डेलाइट सेव्हिंग टाइम संपला आहे. युनायटेड स्टेट्समध्ये, डेलाइट सेव्हिंग वेळ नेहमी मार्चच्या दुसऱ्या रविवारी सुरू होतो. नोव्हेंबरच्या पहिल्या रविवारी याचा कालवधी संपतो. तर, यूके आणि युरोपीय देशांमध्ये ते मार्चच्या शेवटच्या रविवारपासून ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारपर्यंत हा डेलाइट सेव्हिंग टाइम असतो. मार्चमध्ये घड्याळाचे काटे एक तास पुढे सरकवले जातात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घड्याळ एक तास मागे घेतले जातात.

Read More