Marathi News> विश्व
Advertisement

विमानात कधीच स्लीपर किंवा हाय हिल्स घालून का जाऊ नये? फ्लाइट अटेंडंटनंच सांगितलं कारण

Tips for airplane travel : विमानानं प्रवास करताना फॅशन आणि स्टाईलच्या नादात फसू नका... आधी ही महत्त्वाची माहिती वाचा   

विमानात कधीच स्लीपर किंवा हाय हिल्स घालून का जाऊ नये? फ्लाइट अटेंडंटनंच सांगितलं कारण

Tips for airplane travel : प्रवास रेल्वेनं  असो किंवा विमानानं किंवा अगदी बसनं... दुचाकी वगळता प्रवासाच्या इतक कोणत्याही माध्यमासाठी कायमच आरामदायी सुविधांची निवड केली जाते. अनेकजण या प्रवासासाठी कपडेसुद्धा अगदी आरामदायी घालतात. अगदी चपलांची निवडही याच अनुषंगानं होते. मात्र, काही मंडळी आरामदायी पर्यायांऐवजी लूक किंवा फॅशनलाही पसंती देतात बरं. विमानानं प्रवास करताना तर काहीजण चक्क टापटिप जातात. काहीजण मात्र स्लीपरला प्राधान्य देतात. 

तुम्हाला माहितीये का विमानानं प्रवास करताना क्रॉक्स, स्लीपर कितीही आरामदायी असल्या तरीही त्या वापरणं सुरक्षेच्या दृष्टीनं मात्र फायद्याचं नाही. अमेरिकन एयरलाइंसमधील फ्लाईट अटेंडंट अँड्रीया फिशबॅकनं याबबातची माहिती दिली असून, वरील प्रकारच्या चपला आणि अगदी हाय हिल्ससुद्धा अडचण निर्माण करु शकतात. 

Whattowear.co.uk सोबत बोलताना या अटेंडंटनं एखाद्या आपात्कालीन प्रसंगी विमान तातडीनं रिकामं करण्याच्या सूचना दिल्या जातात तेव्हा बऱ्याच अडचणी निर्माण होतात. ज्यामुळं प्रवाशांना घाईनं पळता येत नाही, अनेकदा स्लीपरनं पाय घसरण्याचा धोका निर्माण होतो. परिणामी प्रवासी दुखापतग्रस्त होऊ शकतात. 

एअर होस्टेस तर हिल्स वापरतात... त्याचं काय? 

असा प्रश्न केला असता टेक ऑफ अर्थात विमान आकाशात झेपावल्यानंतर फ्लाईट अटेंडंट त्यांच्या चप्पल बाजूला काढून ठेवतात. प्रत्यक्षात इथं या कृतीला अव्यवहारिक मानलं जातं. मात्र उंच टाचांच्या चपला वापरताना एखादा आपात्कालीन प्रसंग आलाच तर त्यामुळं व्यक्तीला दुखापत अथवा इजा होऊ शकते. दुसऱ्या व्यक्तीलाही यामुळं धोका संभवतो, ज्यामुळं विमानात प्रवास करताना हाय हिल्स, स्लीपर वापरू नयेत. 

विमानानं प्रवास करत असताना अनेकांचाच उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. मात्र या उत्साहात काही गोष्टींकडे दुर्लक्ष न केलेलं बरं. सहसा प्रवासासाठी पाय पूर्ण बंद होतील असे वजनानं हलके असणारे आणि चांगली पकड असणारे शूज वापरण्ं कधीही उत्तम. त्यामुळं ही बाब विसरु नका!!!

Read More