Trending News In Marathi: 26 वर्षांची केसी पिकअप इंग्लंडच्या लँकाशायर येथील रहिवाशी आहे. मात्र अचानक तिने जॉब आणि देश दोन्ही सोडण्याचा निर्णय घेतला. लंडनमध्ये ती सेल्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होता. मात्र या नोकरीत तिला आनंद मिळत नव्हता. ब्रिटनमधले थंड आणि सतत पाऊस असे हवामान तिला पसंत नव्हते. प्रत्येक दिवस एकसारखाच वाटू लागलेला. सतत धावपळ आणि कामाचा ताण या सगळ्यात स्वतःसाठी वेळच मिळायचा नाही.
मार्च 2023 केसीने एक टिकटॉक व्हिडिओ अपलोड केला आणि आता जग पूर्ण फिरणार याचीच घोषणा केली. तिने थायलँड आणि बालीची ट्रिप सुरू केली आणि अन्य सोलो ट्रॅव्हलर्सना सोबत येण्याचे निमंत्रण दिले. सात जणांचा ग्रुप बनवला त्यानंतर त्यांनी सात जणांचा एक ग्रुप बनवून थायलँड सहा आठवड्यात फिरण्याचा प्लान केला.
प्रवासादरम्यान केसी 26 वर्षांच्या मार्केटिंग प्रोफेशनल टेलर बार्करच्या प्रेमात पडली. आतापर्यंत दोघांनी मिळून 12पेक्षा जास्त देश फिरले आहेत. केसी आता दर महिन्याला 5,000 पाउंडपेक्षा जास्त कमावतात. ते ब्रँड्ससाठी कंटेट क्रिएट करतात आणि त्यांना इतर ठिकाणी फिरण्यासाठी पैसे देतात.
केसीच्या म्हणण्यानुसार, आशियात राहणं ब्रिटनच्या तुलनेत कमी खर्चिक आहे. ब्रिटनला दुप्पट पैसे खर्च करावे लागतात. सध्या केसी दर महिन्याला जवळपास 2,000 पाउंडमध्ये आलिशान रेस्तराँमध्ये जेवण, मसाज आणि ब्यूटी ट्रीटमेंट करुन घेतात. त्यांचा थायलँडचा फ्लॅट दोन मजल्याचा होता. ज्यात स्विमिंग पूल आणि जिमची सुविधादेखील आहे. याचे भाडे फक्त 560 पाउंड होते.
केसी सांगते की, आशियात स्वस्तात अधिक सुविधा मिळते. स्ट्रीट फूड 1-2 पाउंडमध्ये मिळते. तर वेस्टर्न फूड 4-5 पाऊंड खर्च करावे लागतात. हॉटेल आणि विलामध्ये फक्त 10-30 पाऊंड प्रतिदिन इतक्या पैशात मिळतात. युरोपमध्ये ज्या लाइफस्टाइलसाठी 40000 पाउंड खर्च करावे लागतात ते आशियात 2,000 पाउंडमध्ये होऊन जाते.
केसीचं म्हणणं आहे की, आता तिला यूकेला पुन्हा परतायचं नाहीये. दररोज सकाळी उठल्यावर समोर समुद्र असतो. तिच्या आवडीच्या प्रोजेक्ट्सवर काम करायला मिळते. सुंदर जागी फिरायला मिळते. यूकेमध्ये कधीही न मिळालेल्या स्वातंत्र्याची भावना इथे जाणवते. आता, केसी सोशल मीडियावर तिचे अनुभव शेअर करते आणि इतरांना "डिजिटल नोमॅड" बनण्यासाठी प्रेरित करते. तिला लोकांची स्वप्ने सत्यात उतरवायची आहेत आणि त्यांचे कंटाळवाणे जीवन सोडून नवीन जीवन सुरू करण्यासाठी प्रेरित करते.