Marathi News> विश्व
Advertisement

VIDEO: 'माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले...' चिमुकल्या बाळाने गिळल्या आजोबांच्या अस्ती

Toddler Accidentally Eats Grandfather Ashes: महिलेने एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती तिच्या मुलाने केलेली आश्चर्यकारक कृती दाखवताना दिसतेय.

VIDEO: 'माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले...' चिमुकल्या बाळाने गिळल्या आजोबांच्या अस्ती

Toddler Accidentally Eats Grandfather Ashes: घरात लहान मुले असले की तुम्हाला डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कारण ती सतत इकडे तिकडे धावत राहतात आणि घरात फिरताना त्यांना जे काही मिळते ते ते थेट तोंडात घालतात. आता एका लहान मुलाबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनमधील एका आईने तिच्या लहान मुलाच्या धक्कादायक कृतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा मुलगा 1 ते 3 वर्षांचा असावा. सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या या कथित व्हिडिओनुसार या मुलाने असं काही खाल्ले आहे ज्याची कोणीही कल्पनाही करू शकत नाही. डेली मेलने यासंदर्भात वृत्त दिले आहे. महिलेने एक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती तिच्या मुलाने केलेली आश्चर्यकारक कृती दाखवताना दिसतेय.

एक महिलेने तिच्या मुलाला बैठकीच्या खोलीत सोडले आणि ती तिच्या खोलीत कपडे घालण्यासाठी गेली. त्यावेळी मुलाने एक विचित्र कृत्य केले. बैठकीच्या खोली मुलाच्या आजोबांच्या अस्ती ठेवण्यात आल्या होत्या. एकाकलशात मृतदेहाच्या हाडांची राख ठेवण्यात आली होती. महिलेने जेव्हा पाहिलं तेव्हा तिचे मुलाने कलशातील राख घरभर विखुरली होती आणि त्याने आपल्या लहान हातांनी उचलून ती राख खाल्ली. खोलीतून बाहेर आल्यानंतर तिने मुलाला पाहिले आणि तिला धक्का बसला.

'माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले'

नताशा अमिनी नावाच्या या महिलेने तिच्या मुलाची ही कृती कॅमेऱ्यात कैद केली आणि सोशल मीडियावर शेअर केली. त्या महिलेचा मुलगा कोआह अवघ्या 1 वर्षाचा आहे. जेव्हा नताशा खोलीतून बाहेर आली आणि तिने पाहिले तेव्हा त्याच्या वडिलांची राख पसरलेली होती. मुलाचा चेहरा आणि हात राखेने माखलेले होते.'अरे देवा, माझ्या मुलाने त्याच्या वडिलांना खाल्ले', असे  व्हिडिओ बनवताना, ती महिला वारंवार म्हणत होती. 

पाहा व्हिडीओ

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Fratshows (@fratshows)

'मी माझ्या वडिलांच्या अस्ती वरच्या कपाटात ठेवल्या होत्या. त्या कशा खाली आल्या? याचे मला आश्चर्य वाटते,' असे नताशा सांगते. मुलाच्या कृतीनंतर नताशा थोडी निराश आहे. 'पण जर माझे वडील इथे असते तर हे सर्व पाहून ते खूप हसले असते. माझे वडील माझ्या मुलाला कधीच पाहू शकले नाहीत. पण आता ते नेहमीच त्याच्यासोबत असतील, असेही तिने सांगितले.

सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रतिक्रिया 

आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हे धक्कादायक दृश्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि त्यावर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक लोकांना सुरुवातीला हा एप्रिल फूलचा विनोद वाटला पण व्हिडिओ पाहिल्यानंतर तो विनोद विश्वासात बदलला. यावर एका युजरने लिहिले आहे की, 'मुलाने आजोबांना नाश्त्यात खाल्लं'. दुसरा एक यूजर्स लिहितो, 'तुम्ही तुमच्या मुलाला सांगू शकता की तुझ्यात तुझ्या आजोबांचे गुण आहेत.' आणखी एकजण लिहितो, आता मुलाचे आजोबा त्याच्या प्रत्येक रंजकतेचा एक भाग बनले आहेत. ती महिला अजूनही तणावात आहे. मुलाने जास्त राख खाल्ली नाहीये त्यामुळे तो सध्या पूर्णपणे ठीक असल्याचंही सांगण्यात येतंय.


(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Read More