Marathi News> विश्व
Advertisement

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

Wedding Video : वधू वरासह पूजारी आणि वऱ्हाड्यांनी उंच डोंगरावरुन उडी मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊयात.

Video : लग्नानंतर उंच पर्वतावरून वधू-वरासोबत पुजारी, वऱ्हाड्यांनी मारली उडी; विचित्र लग्नाचा थरारक व्हिडीओ VIRAL

Bride Groom Viral Video : लग्नाबद्दल वधू वरासोबत दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा अनेक कल्पना असतात. लहानपणापासून मुलीने आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवल्या असतात. लग्नातील साडी, ड्रेस, मेहंदी, लग्नाचे ठिकाण, मेजवानातील पदार्थ असे अनेक गोष्टींबद्दल तिची कल्पना असते. गेल्या काही वर्षांपासून Destination Wedding फाड आलं आहे. अगदी आपलं लग्न जगावेगळं कसं असेल त्याची कल्पना आजकालची पीढी करत असतात. त्यात प्री वेडिंग फोटोशूट हा नवी ट्रेंडिंग आला. (trending news bride groom skydiving wedding video viral on Social media google news today)

अनोख्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल 

सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाच्या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. यात एका उंच टेकडीवरुन वधू वरासह वऱ्हाड्यांनी उडी मारली. अगदी पूजारीदेखील या लग्नात वधू वराच्या पाठोपाठ उडी मारतात. आता तुम्ही म्हणाल हा काय मुर्खपणा आहे. तर थांबा आम्ही तुम्हाला सांगतो या अनोख्या लग्नाची कहाणी...

...म्हणून त्यांनी मारली उडी

ते झालं असं की, हटके लग्न करायचं म्हणून या वधू वराने उंच कड्यावरुन उडी मारत स्कायडायव्हिंग करत एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचे वचन दिले. हा साहसी आणि अनोखा विवाह सोहळ्याला पूजारी आणि वधू वरांच्या नातेवाईक, मित्रमैत्रीणींनीही साथ दिली. या लग्नासाठी त्यांनी सुरक्षेचे सगळे उपाययोजना केली होती. 


''भीती पलीकडलं जग''


ही पोस्ट @lalibretamorada ने Instagram वर शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, ''आयुष्य भरासाठी ज्या जोडीदाराचा हात पकडला त्या हाताला धरुन आम्ही भीती पलीकडल्या जगात उडी मारली आहे.''

या अनोख्या लग्नाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. एका यूजर्सने तर म्हटलं आहे की, मला हे खूप आवडलं. मीही माझ्या लग्नात नक्की या पद्धतीने करणार आहे.

दुसरा म्हणाला की, ''अरे देवा, हा व्हिडीओ पाहून मला भीती वाटली, पण ते काहीही असो पण हे अप्रतिम आहे. ''

Read More