Marathi News> विश्व
Advertisement

कोणतंही काम न करण्याचं काम... Google 'त्या' कर्मचाऱ्यांसाठी मोजणार घसघशीत रक्कम, वाचून व्हाल अवाक्

Job News : दर दिवशी असंख्य मंडळी नोकरीच्या नव्या संधीच्या शोधात असतात. नवं काहीतरी शिकण्यच्या हेतूनं सुरु होणारा शोध अनेक निकषांवर आधारित असतो...   

कोणतंही काम न करण्याचं काम... Google 'त्या' कर्मचाऱ्यांसाठी मोजणार घसघशीत रक्कम, वाचून व्हाल अवाक्

Google Jobs Trending News: दर दिवशी, क्षणाक्षणाला असंख्य मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याच्या बळावर, आपल्या शिक्षणाला, कौशल्याला आणि प्रामाणिकपणाला न्याय देईल अशा नोकरीच्या शोधात असतात. मागील काही वर्षांमध्ये नोकरीच्या एक  ना अनेक संधी आणि तितक्याच बहुविध क्षेत्रात करिअर करण्याच्या नव्या वाटा तयार झाल्या आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राची यामध्ये सरशी पाहायला मिळत आहे. त्यातच झालेली क्रांती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअर इंटेलिजेन्स (AI). 

Google कडूनही AI चा सर्वतोपरी वापर केला जात असून, त्याचे नवनवीन वर्जन लाँच केले जात आहेत. अनेक ठिकाणी मानवी योगदानाची जागा या एआयनं घेतली आहे. याच वाटचालीमध्ये Google नं थक्क करणारं आणखी एक पाऊल उचललं आहे. सध्या गुगल कर्मचाऱ्यांना कोणतंही काम न करण्याचं काम देत आहे. आश्चर्य वाटत आहे ना? इथं कंपनीला एक सामंजस्य करार अपेक्षित आहे. 

कामच करायचं नाही, हेच तुमचं काम.... 

Google ही कंपनी सोडल्यानतंर कर्मचाऱ्यांनी एका निश्चिर काळासाठी त्यांच्याशी थेट स्पर्धेत असणाऱ्या कोणत्याही कंपनीमध्ये काम न करणं अशी कंपनीची अपेक्षा आहे. या प्रक्रियेत एका कराराअंतर्गत कर्मचाऱ्यांना रितसर पगार मोजला जाईल, पण असं करत असताना मात्र या कर्मचाऱ्यांना दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याची परवानगी मात्र नसेल. काही प्रकरणांमध्ये हा काळ वर्षभराचाही असू शकतो. 

काम न करता पैसे मिळणं हे अनेकांचच स्वप्न असलं, एक कल्पना असली तरीही प्रत्यक्षात असं होणं AI संशोधकांच्या करिअरवर परिणाम करणारं पाऊल ठरत आहे. मायक्रोसॉफ्टच्या AI चे उपाध्यक्ष आणि डीपमाईंडचे माजी कर्मचारी नांडो डी फ्रीटास यांनी X च्या माध्यमातून हा मुद्दा उजेडात आणत अनेकदा कर्मचारी आपल्याशी संपर्क साधून या परिस्थितीत नेमकं काय करणं अपेक्षित आहे, गुगलचे हे करार नेमके कसे नाकारायचे, इथपासून त्यांच्याकडे नोकरीच्या काही संधी आहेत का? इथपर्यंतचे प्रश्नही विचारतात. करिअरमध्ये न थांबता पुढे जाण्यासाठीचा हाच मार्ग अनेकजण सध्या निवडताना दिसत आहेत. 

हेसुद्धा वाचा : एलॉन मस्क अमेरिकाच नाही, तर 'या' दोन देशांचेही नागरिक; जन्म कुठला माहितीये? 

 

अनेकदा बहुतांश संस्था नोकरकपात किंवा तत्सम निर्णय घेत असताना कर्मचाऱ्यांकडून Contract वर सही करून घेतता. यामध्ये बऱ्याच छुप्या अटींचीसुद्धा नोंद केलेली असते. त्यामुळं नोकरी स्वीकारताना ज्याप्रमाणं कर्मचारी सतर्क असतात त्याचप्रमाणं नोकरी सोडतानासुद्धा त्यांनी सतर्क राहणं अपेक्षित आहे. अन्यथा करारबद्ध झाल्यास करिअरच्या वाटेत अडचणी आल्याच म्हणून समजा. 

Read More