Marathi News> विश्व
Advertisement

केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

Trending News : दिवसभरातील बराचसा वेळ अनेकजण हे सोशल मीडियावर घालवत असतात. पण काही जण असेही आहेत जे सोशल मीडियावर कमाई करुन कोट्यधीश झाले आहेत. एका स्कॉटिश महिलेने फक्त केस धुण्याचे व्हिडीओ तयार करुन लाखोंची कमाई केली आहे.

केस धुवून 'ही' महिला बनली कोट्यधीश; कर्ज फेडून घेतलं आलिशान घर

Trending News : सोशल मीडियाने अनेकांचे आयुष्य बदललं आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, सोशल मीडिया हे केवळ मनोरंजन साधन नाही तर पैसे कमावण्याचे एक नवीन साधनही बनले आहे. युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि टिकटॉकच्या माध्यमातून अनेक लोक लाखो आणि करोडो रुपये कमावत आहेत. हे सगळे लोक वेगळा कंटेट तयार करुन त्यांच्या व्हिडिओंद्वारे लोकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होत आहेत. स्कॉटलंडमधील एका महिलेने तिची नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएटर बनली. सोशल मीडियावर फक्त एक काम करुन येणाऱ्या कमाईतून ही महिला आता ऐशोआरामात जीवन जगत आहे.

स्कॉटिश महिला Zia O'Shaughnessy फक्त केस धुण्याचे व्हिडिओ बनवून पैसे कमवत आहे. या महिलेचे इंस्टाग्राम आणि टिकटॉकवर बरेच फॉलोअर्स आहेत. जियाने 2021 मध्ये टिकटॉकवर केस धुण्याच्या पद्धतीविषयी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ लगेचच तुफान व्हायरल झाला. जियाचा हा व्हिडिओ सुमारे साडेतीन कोटी लोकांनी पाहिला. त्यामुळे जियाने तिची नोकरी सोडली आणि कंटेंट क्रिएटर म्हणून पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zia (@curlyzia.xo)

द सनच्या वृत्तानुसार, जियावर एकदा 8 लाख रुपयांचे कर्ज होते. पण एक व्हिडीओ व्हायरलनंतर जियाची कमाई इतकी वाढली की तिने केवळ 29 व्या वर्षीच तिचे कर्ज फेडले. यासोबत तिने स्वतःचे घरही विकत घेतले. त्या घराची किंमत अंदाजे 1.8 कोटी रुपये होती. टिक टॉकवर जियाच्या व्हिडिओच्या लोकप्रियतेनंतर तिची संपत्तीही प्रचंड वाढली. एका व्हिडिओतून ती सरासरी 4 लाख रुपये कमावते. हा काही मिनिटांचा व्हिडीओ बनवायला मात्र तिला एक तास लागतो. दोन मुलांची आई असलेली जिया घरात राहून चांगली कमाई करून अनेकांसाठी प्रेरणा बनली आहे.

Read More