Marathi News> विश्व
Advertisement

VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील

Viral Video : जेव्हा एखाद्याला कर्करोग होतो तेव्हा त्या रुग्णाला केमोथेरपी घ्यावी लागते. या केमोथेरपीमध्ये केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. लांब सडक केसांमुळे महिलांचं सौदर्यं खुलून दिसतं. पण जेव्हा हे केस कापण्याची वेळ येते तेव्हा त्या खचून जातात...

VIDEO : धुंद होते शब्द सारे! कॅन्सरग्रस्त महिलेसाठी सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ, पाहून डोळे पाणावतील

Trending Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री ज्यांनी आपल्या अभिनयाने जग जिंकलं. त्या अभिनेत्रीने हसत हसत कॅन्सरवर (Cancer) मातही केलं. मनीषा कोईराला, सोनाली बेंद्रे, किरण खेर, लिसा रे आणि महिमा चौधरी या अभिनेत्रींनी कॅन्सरशी (Bollywood Actress Fight With Cancer) दोनहात करुन त्यावर विजय मिळवला. कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी हा काळ खूप कठीण असतो. एक एक क्षणाला तुम्ही खचता, ढासळता...एका क्षणाला तुम्ही कोसळून जाता. अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण या काळात इतके खचून जाता की ते जीवन संपवण्याचा विचार करतात. या काळात रुग्णांचा आत्मविश्वास कमजोर होतो. अशावेळी त्यांना घरच्यांची आणि समाजातील लोकांची गरज असते. 

धुंद होते शब्द सारे!

कॅन्सरग्रस्त रुग्णांना (Cancer patients)  केमोथेरपी (Chemotherapy) दिली जाते. अशावेळी त्यांचे केस जातात. महिलांना त्यांचे केस खूप प्रिय असतात. केसांनी महिलांचं सौदर्यं अधिक खुल्लतं. त्यामुळे जर महिलांना कर्करोग झाला असेल तर त्यांचासाठी केस जाणे हे सगळ्यात वेदनादायी क्षण असतो. केस (cuts hair) गेल्यामुळे आपण कुरुप दिसणार या भावनेने त्या बिथरुन जातात. अशावेळी त्यांना नव्याने उभं राहण्यासाठी एका प्रकाशाची गरज असते. 

'तुझ्यासाठी काहीपण'

सोशल मीडियावर (Social Media) असाच एक हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. कॅन्सरग्रस्त महिला सलूनमध्ये केस काढण्यासाठी आली होती. तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते. सलूनवाल्यांसाठीही हा क्षण कठीण होता. ज्या महिला ग्राहकाला तो कायम वेगवेगळ्या हेअरस्टाईल (hairstyle) करुन बोल्ड आणि ब्युटीफूल (Bold and beautiful) बनवतं होता. आज त्याचावर ही अशी वेळ..त्याचे हात थरथर होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. तिचे पूर्ण केस काढल्यामुळे टक्कल (Baldness) झाल्यानंतर तो तिला घट्ट मिठी मारतो...तिला धीर देण्याचा प्रयत्न करतो. (Trending salon owner shaved off his head hair for a woman suffering from cancer Emotional Video Viral on Social media )


सलूनवाल्यानं 'अशी' दिली साथ

संपूर्ण केस काढल्यानंतर ती महिला स्वत:ला आरशात पाहण्यासाठीही घाबरतं होती. अशावेळी आपण तिला कशी साथ देण्यार अशा विचारत असतानाच सलूनवाल्याने जे केलं त्यानंतर त्याला सलाम आहे. त्या सलूनवाल्याने आपल्या कॅन्सरग्रस्त महिला ग्राहकाला साथ देण्यासाठी आपल्या डोक्यावरूनही त्याने वस्तारा फिरवला. त्याचं हे काम पाहून महिलेला आश्चर्याचा धक्का बसला... ती त्याला थांबवतं होती पण तो त्याचा निर्णयावर ठाम होता. त्याची ही मोलाची साथ पाहून महिलेचे डोळे पाणावले. 


व्हिडीओ व्हायरल 

हा व्हिडीओ आपल्या हृदयाला जाऊन भिडतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर goodnews_movement या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ पाहून आजही माणुसकी जिंवत आहे हे कळतं. सलूनवाल्याच्या या कामामुळे त्याने जगासमोर आदर्श ठेवला आहे. रक्तांच्या नात्यापलिकेही असं एक नातं असतं जिथे नावाची, शब्दाची कसलीही गरज नसते. हा व्हिडीओ पाहून एवढंच मनात येतं की, धुंद होते शब्द सारे!

Read More