Trump Tariffs impacts on India : अमेरिकेच्या (America India) राष्ट्राध्यक्षपदी असणाऱ्या (Donald Trump) डोनाल्ड ट्रम्प यांनी या महासत्ता राष्ट्राची सूत्र हाती घेतल्या क्षणापासून आयात शुल्कासंदर्भातील मुद्दा सर्वाधिक चर्चेत राहिला आणि आता भारतावरही त्याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. भारतावर लागू करण्यात आलेल्या 25 टक्के वाढीव आयात शुल्कामुळं आता देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर एकूण 50 टक्के आयातशुल्क आकारलं जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ज्यामुळं भारतातील स्थानिक व्यापारातील अनेक क्षेत्रांवर आणि परिणामी सामान्यांवरही याचा परिणाम होताना दिसणार आहे. अर्थात या परिणामांचं स्वरुप वेगळं असलं तरीही बहुतांशी परिणाम हे आर्थिक बदलांमधीलच असतील असं जाणकारांनी स्पष्ट केलं आहे.
स्पष्टच शब्दांत सांगावं तर, भारतातील चर्मउद्योग क्षेत्र, रसायन निर्मिती क्षेत्र, पादत्राणांचा व्यवसाय, खेळ, दागदारिने, कापडउद्योग, कोळंबीची शेती (मत्स्यशेती) या क्षेत्रांवर आयात शुल्क निर्बंधांचे थेट परिणाम होताना दिसतील.
भारतावर वाढीव 25 टक्के आयात शुल्काचा मारा हा रशियाकडून सुरू असणाऱ्या तेल खरेदीच्या मुद्दमुळं करण्यात येत असल्याचं खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच स्पष्ट केलं. 27 ऑगस्टपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार असून सध्याच्या घडीला फक्त भारत, चीन आणि तुर्की याच देशांसाठी अमेरिकेची ही कठोर भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे.
दरम्यान यापूर्वी अमेरिकेकडून घोषित करण्यात आलेल्या प्राथमिक 25 टक्के आयात शुल्काच्या अंमलबजावणीची सुरुवात 7 ऑगस्टपासूनच करण्यात आली असून, त्यामागोमागच वाढीव आयात शुल्काचा मारासुद्धा यात भर घालणार आहे. तज्ज्ञांच्या मते अगदी सोप्या शब्दांत या आर्थिक युद्धाचं विश्लेषण करायचं झाल्यास, अमेरिकेमध्ये भारतीय वस्तू (भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू) 40 ते 50 टक्क्यांनी महागणार आहेत.
नैसर्गिक रसायनं- 54 टक्के
कपडे – विणकाम केलेले (63.9 टक्के) विणकाम आणि इतर पद्धतींनी तयार केलेले (60.3 टक्के)
कापड – रेडीमेड (59 टक्के)
हिरे, सोनं आणि तत्सम उत्पादनं- 52.1 टक्के
यंत्र आणि तत्सम उपकरणं – 51.3 टक्के
फर्निचर, बेडिंग, मॅट्रेस- 52.3 टक्के
अमेरिकेने भारतावर कोणता नवीन आयात शुल्काचा निर्णय घेतला?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंवर 25 टक्के वाढीव आयात शुल्क लागू केले आहे, ज्यामुळे एकूण आयात शुल्क 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
हा आयात शुल्काचा निर्णय का घेण्यात आला आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणांची खरेदी सुरू ठेवल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या भारतीय क्षेत्रांवर या शुल्कवाढीचा परिणाम होईल?
भारतातील खालील क्षेत्रांवर या शुल्कवाढीचा थेट परिणाम होईल: