Marathi News> विश्व
Advertisement

Boycott Turkey: भारत बहिष्कार टाकत असताना तुर्कीएच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले 'चांगलं असो किंवा वाईट, आम्ही...'

Boycott Turkey: पाकिस्तानला मदत करत असल्याने भारतामध्ये तुर्कीएविरोधात संताप असून, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु आहे. यादरम्यान तुर्कीएचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन यांना देशाची भूमिका मांडली आहे.   

Boycott Turkey: भारत बहिष्कार टाकत असताना तुर्कीएच्या राष्ट्राध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले 'चांगलं असो किंवा वाईट, आम्ही...'

Boycott Turkey: तुर्कीए आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकण्यासाठी भारतात आवाहन केलं जात असताना, तुर्कीएचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचा त्यांनी प्रिय बंधू असा उल्लेख केला आहे. रेसेप तय्यप एर्दोआन यांनी एकतेचे आश्वासन देत म्हटलं की तुर्की चांगल्या आणि वाईट काळात पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली असून, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानविरोधात उघडलेल्या मोहिमेदरम्यान तुर्कीएने मात्र पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टला उत्तर देताना तुर्कीएच्या राष्ट्राध्यक्षांनी आपली भूमिका मांडली आहे. 

तुर्कीएला भारताचा आणखी एक दणका! पर्यटन, व्यापारानंतर आता आणखी एक बहिष्कार

 

"भूतकाळाप्रमाणे, आम्ही भविष्यात चांगल्या आणि वाईट काळात तुमच्या पाठीशी उभे राहू," असे रेसेप तय्यप एर्दोआन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या पोस्टला उत्तर देताना सांगितलं आहे. तसंच हे खऱ्या मैत्रीचं उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. 

दहशतवादाचा निषेध करण्याऐवजी पाकिस्तानची बाजू घेतल्याबद्दल तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांना भारतीयांच्या संतापाला सामोरं जावं लागत आहे. भारतीय लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानने सीमापार हल्ल्यांमध्ये वापरलेले ड्रोन तुर्की मूळचे असल्याचे उघड केल्यानंतर हा तणाव वाढला. प्राथमिक निष्कर्षांमध्ये ते असिसगार्ड सोंगर मॉडेल असल्याचं आढळून आलं, ज्यामुळे तुर्कीच्या पाकिस्तानला थेट लष्करी पाठिंबा देण्यासंदर्भात चिंता निर्माण झाली.

सोशल मीडियावर भारतीयांनी तुर्की आणि अझरबैजानी वस्तू आणि पर्यटनावर पूर्ण बहिष्कार टाकण्याचं आवाहन केले आहे. #BoycottTurkey आणि #BoycottAzerbaijan सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

प्रमुख प्रवास कंपन्यादेखील यात सामील झाल्या आहेत. MakeMyTrip ने तुर्की आणि अझरबैजानला अनावश्यक प्रवास करु नये असा सल्ला दिला आहे. EaseMyTrip च्या संस्थापकांनी भारतीयांना चिनी उत्पादने खरेदी करणं थांबवण्याचं आवाहन देखील केले आहे. इक्सिगोने तुर्की, अझरबैजान आणि चीनमधील सर्व बुकिंग स्थगित केल्या आहेत, तर क्लिअरट्रिपने एका आठवड्यात या देशांमधील बुकिंग रद्द करण्याचं प्रमाण 260 टक्के वाढल्याचं म्हटलं आहे. 

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीएप्रमाणेच अझरबैजानलाही आता पाकिस्तानशी संबंध जोडल्याबद्दल संतापाचा सामना करावा लागत आहे. अनेक भारतीय अप्रत्यक्षपणे दहशतवादाला पाठिंबा देण्याच्या दोन्ही देशांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Read More