Marathi News> विश्व
Advertisement

श्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान

श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.

श्रीलंकेत मोठी राजकीय घडामोड, राजपक्षे नवे पंतप्रधान

कोलंबो : श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात. महिंदा राजपक्षे यांनी शुक्रवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतलीय. राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी रनिल विक्रमसिंघे यांच्या पक्षासोबतची युती तोडून राजपक्षे यांची पंतप्रधानपदी नेमणूक केली. 

विशेष म्हणजे २०१५ मध्ये सिरीसेना हे राजपक्षे यांचा पराभव करत राष्ट्रपतीपदावर विराजमान झाले होते. श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांच्या युनायटेड पीपल्स फ्रिडम अलायन्सने रनिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीसोबतच्या आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली.

यानंतर सिरीसेना यांनी पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे यांची नियुक्ती केली. राजपक्षे यांनी विक्रमसिंघे यांची जागा घेतली आहे. सिरीसेना आणि विक्रमसिंघे यांच्यातील तणावपूर्ण संबंधामुळे या घडामोडी घडल्या. राजपक्षे हे चीनधार्जिणे असून या घडामोडींकडे भारताचंही लक्ष लागलंय.   

Read More