Marathi News> विश्व
Advertisement

सात कासवांचा पाण्यात मजेशीर खेळ, Video पाहून तुम्हीही व्हाल खुश

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. 

सात कासवांचा पाण्यात मजेशीर खेळ, Video पाहून तुम्हीही व्हाल खुश

Turtles Played Fun Game: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वाधिक पसंती ही प्राण्यांच्या व्हिडीओंना असते. प्रवास किंवा फावल्या वेळेत या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक कासवांचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत 7 कासव पाण्यात मजेशीर खेळ खेळताना दिसत आहेत. 

व्हायरल व्हिडीओत एक तलाव दिसत आहे. यात सात कासव लाकडी ओंडक्यावर स्वार झाल्याचं दिसत आहे. त्यानंतर त्यांचा त्या लाकडी ओंडक्यावर खेळ सुरु होतो. सातही कासव ओंडका या बाजूने त्या बाजूला हलवत राहतात. सुरुवातीला सातही कासव ओंडक्यावर तग धरून राहतात. पण नंतर एक एक करत चार पाण्यात पडतात आणि शेवटी तीन कासव हा खेळ जिंकतात. कासवांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  

हा व्हिडिओ Buitengebieden नावाच्या ट्विटर अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. यासोबत 'मला हा खेळ आवडला' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. आतापर्यंत 8.4 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा मजेशीर व्हिडिओ पाहिला आहे. त्याच वेळी, सुमारे 5 लाख लोकांनी व्हिडिओला लाइक केले आहे.

Read More