Twin Marriage : अनेकदा तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की जुळी मुलं ही लहानपणापासूनच सर्व कामे ही एकत्र करत असतात. जसे की ते एकमेकांवर जसे प्रेम करतात तसे ती खेळताना आणि फिरताना देखील सोबतच असतात. म्हणजेच कोणतेही काम असो जुळी मुलं ही एकत्रच करतात. कपड्यांपासून ते त्यांच्या आवडी निवडीपर्यंत सर्व काही त्यांचे समान असते.
मात्र, तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की जुळ्या बहिणीचे लग्न हे जुळ्या भावांसोबत झालं आहे. तसेच या जुळ्या भावांची मुले देखील एकत्र जन्माला येतात? काय आहे अमेरिकेतील जुळ्या भावांची आणि जुळ्या बहिणींची कहाणी? जाणून घ्या सविस्तर
जुळ्या बहिणींकडून एकाच वेळी गर्भधारणेचे नियोजन
अमेरिकेत जुळ्या बहिणींनी जुळ्या भावांसोबत लग्न केलं आहे. यामध्ये जुळ्या बहिणींची नावे ब्रिटनी आणि ब्रायना अशी आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या दोन्ही जुळ्या बहिणींना मुलेही एकत्र जन्माला आली आहेत. कारण ब्रिटनी आणि ब्रायना या दोघींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या एकत्र केल्या आहेत. कारण त्या एकत्र राहतात. त्यांचे वाढदिवस एकत्र साजरे करतात. त्यासोबतच दोघींनी एकाच वेळी गर्भधारणेचे नियोजन केले होते. त्यामुळे दोघींची मुले देखील जवळजवळ एकाच वेळी जन्माला आली. ती पुढे म्हणाली की, या पुढे देखील आम्हाला सर्वकाही एकत्र करायचे आहे.
ब्रिटनी आणि ब्रायना या दोन्ही जुळ्या बहिणी आहेत. त्यांनी 2018 मध्ये दोन जुळ्या भावांसोबत लग्न केलं. त्यांची नावे जोश आणि जेरेमी सॅलियर आहेत. दोघींनी सामूहिक विवाह केला. 2017 मध्ये एका ठिकाणी भरवण्यात आलेल्या जुळ्या मुलांच्या महोत्सवात या चोघांची भेट झाली होती. त्यानंतर काही महिन्यांनी दोन्ही जुळ्या मुलांनी ब्रिटनी आणि ब्रायनाला प्रपोज केले. यानंतर काही महिन्यांनी त्या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर त्यांचे नाते हे खूप मजबूत झालं. आयुष्यातील अनेक गोष्टी दोघींनी एकत्र केल्या. ज्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्न काढण्यापासून ते कॉलेजमधील पदवीपर्यंत.
ब्रिटनी आणि ब्रायना पुढे म्हणाल्या की, त्यांच्यासाठी लग्न करणे ही खूप भावनिक गोष्ट होती. एकाच वेळी लग्न आणि एकाच वेळी गरोदरपणाचे नियोजन आणि जवळजवळ एकाच वेळी मुलेही जन्माला आली. असं देखील म्हटलं जात आहे की, त्या दोघींची दोन्ही मुले जुळी असू शकतात. परंतु, अस न होता दोघींनी एका मुलाला जन्म दिला आहे.