Marathi News> विश्व
Advertisement

नशीब असावे तर असे... दुकान उघडताचं कमावले 7 कोटी रूपये; कसं शक्य झालं वाचा

व्यक्तीला एका दिवसात मिळाला 2 गुडन्यूज; नशिब चमकले 7 कोटी रूपयांचा झाला लाभ  

नशीब असावे तर असे... दुकान उघडताचं कमावले 7 कोटी रूपये; कसं शक्य झालं वाचा

अमेरिका : आयुष्यात गोष्टी चांगल्या घडत नसतील तरी आपण नशिबाला दोष देत असतो.  चांगलं झालं तर नशीबाचे आभार मानतो, असं फार कमी लोकांनासोबत घडते? असे म्हणतात की नशीब चांगले असेल तर अनेक आनंद एकत्र येतात. अमेरिकेत फ्लोरिडा येथे रहाणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यात एका वेळी दोन आंनदाच्या क्षणांनी प्रवेश केला. प्रथम त्याने आपले ऑटो शॉप उघडले आणि त्याच दिवशी दहा लाखांहून अधिक म्हणजे सात कोटी रुपयांची लॉटरी लागली.

फ्लोरिडामधील एका व्यक्तीने आपले ऑटो शॉप उघडले, त्याचे नशीब व्यवसायाच्या पहिल्याच दिवशी चमकले आणि त्याला आनंदाची बातमी मिळाली, जेव्हा त्याने 1 मिलियनची लॉटरी जिंकली. लॉटरी जिंकल्यामुळे व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबाला आनंद झाला आहे. 

यूपीआय न्यूजनुसार, 46 वर्षीय ब्रायन वुडल यांनी फ्लोरिडा लॉटरीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की, त्यांनी कॅल्हनमधील सर्कलच्या स्टोअरमधून 5 डॉलरचे गोल्ड रश सुप्रीम स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केले. ज्यादिवशी त्यांनी नव्या दुकानाची सुरूवात केली, तेव्हाचं त्यांना 7 कोटी रूपयांची लॉटरी लागली. त्यामुळे  ब्रायन वुडल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

Read More