Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांमध्ये सुरू असणारा संघर्ष दिवसागणित आणखी चिघळत असून, आता या संघर्षात युक्रेन आणखी आक्रमक होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून रशियावर होणारे युक्रेनचे आघात पाहता याचीच प्रचिती येत असून, ड्रोन हल्ल्यांमागोमाग आता पुन्हा एकदा महासत्ता रशियाच्या या शेजारी राष्ट्रानं आणखी एक भयंकर आघात केला आहे.
रशियावर राजनैतिक चाल करत युक्रेननं रशियाच्या मध्यवर्ती भागाशी जोडलेला Kerch Bridge निशाण्यावर घेत तब्बल 1100 किलो वजनांच्या स्फोटकांनी हल्ला केला. युरो न्यूजच्या वृत्तानुसार केरच किंवा केर्च ब्रीज रशियाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असून तो क्रास्नोडार क्षेत्राला क्रिमियाशी जोडतो. याच रणनितीकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या पुलाला युक्रेननं पाण्यातूनच लक्ष्य करत स्फोट घडवून आणला.
पुलावर झालेल्या या स्फोटामुळं पाण्याच्या आत झालेल्या पुलाच्या खांबांचं मोठं नुकसान झालं आणि या हादऱ्याचे पडसाद पुतीन यांच्यापर्यंतही पोहोचले. हा पुल 19 किमीपर्यंतच्या अंतरावर उभारण्यात आला असून, क्रिमीयापर्यंत पोहोचण्यासाठीची ही एकमेव वाट, त्यातही युक्रेनमध्ये असणाऱ्या रशियन सैन्यासाठी रसद पुरवण्यासही याच मार्गाचा वापर केला जात असल्यानं तिथं युक्रेनचा इतका मोठा हल्ला होणं या गोष्टीकडे अतिशय गांभीर्यानं पाहिलं जात आहे.
नुकताच युक्रेननं रशियाच्या हवाई आणि लष्करी तळांवर ड्रोनहल्ला करत या पुतीन यांच्या धोरणांचा कडाडून विरोध केल्याचं पाहायला मिळालं. जागतिक माध्यमांमधील चर्चांनुसार या मोहिमेसाठी युक्रेनकडून ArduPilot नावाच्या 20 वर्षांपूर्वीच्या सॉफ्टवेअरचा वापर करण्यात आला होता. 2007 मध्ये क्रिस एंडरसननं ते तयार केलं होतं. पुढं एंडरसननं जोर्डी मुनेज आणि जेसन शॉर्ट यांच्या साथीनं यावर आणखी काम करत त्याला Community Based Platform मध्ये रुपांतरीत केलं, ज्याचा वापक आजच्या घडीला ड्रोन, नौका, पाणबुडी आणि रोवर्सच्याही नियंत्रणासाठी केला जातो.
Holy shit
— Saint Javelin (@saintjavelin) June 3, 2025
Ukraine's SBU security service behind the audacious drone attack deep inside Russia now says it has attacked the Kerch bridge in occupied Crimea in a months-long operation. It says SBU agents "mined the supports" of the bridge with 1,100kg of TNT under the water line… pic.twitter.com/TvNjHWZZs3
प्रतक्षात शोध आणि बचाव, शेतीची कामं आणि 3D मॅपिंगसारख्या कामांसाठी हे तंत्रज्ञान तयार करण्यात आलं होतं. पण, आता मात्र त्याचा वापर युद्धनितीमध्ये केला जात आहे. युक्रेननंही रशियावर ड्रोन हल्ला करतेवेळी याच सॉफ्टवेअरच्या मदतीनं ड्रोन नियंत्रीत करत ते छुप्या मार्गांनी रशियातील क्षेत्रांपर्यंत पोहोचवले आणि भयावह हल्ले घडवून आणले.