Marathi News> विश्व
Advertisement

आतापर्यंतचा सर्वात रंजक उलगडा; 3000 वर्षांपासून थडग्यांमध्ये दडून राहिलेलं रहस्य अखेर जगासमोर

Egypt Ancient Tombs: संपूर्ण जगापुढं कैक वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीवर भाष्य करणारं रहस्य उघड. आतापर्यंतचा सर्वात मोठा उलगडा...     

आतापर्यंतचा सर्वात रंजक उलगडा; 3000 वर्षांपासून थडग्यांमध्ये दडून राहिलेलं रहस्य अखेर जगासमोर

Egypt Ancient Tombs: इजिप्तमधून आतापर्यंत इतिहासात डोकावण्याची संधी देणारे अनेक खुलासे उत्खननाच्या माध्यमातून समोर आले. मानवी संस्कृतीपासून ते अगदी गतकाळातील भौतिकशास्त्र, स्थापत्यशास्त्र यावरही उत्खननाच्या माध्यमातून उजेड टाकण्यात आला आणि आता याच अमूल्य माहितीमध्ये नव्या संदर्भांची भर पडली आहे. 

इजिप्तमधील लक्सर इथं एका प्राचीन दफन स्थळी नव्यानं तीन थडगी समोर आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार कैक हजार वर्षांपूर्वीची ही थडगी न्यू किंग्डम युग ( इसवी सन 1539 ते 1077) काळातील महत्त्वाच्या व्यक्तींची असल्याचं इजिप्तमधील पुरातत्वं आणि पर्यटन मंत्रालयानं स्पष्ट केलं. लक्सरमधील एक महत्त्वाचं कब्रस्तान असणाऱ्या द्रा’अबू एल नागा इथं उत्खननातून हे संदर्भ जगासमोर आले. 

इजिप्तच्या यंत्रणेनं हे अतिशय महत्वपूर्ण संशोधन असल्याचं सांगत या ठिकाणी झालेल्या खोदकामात सर्वस्वी इजिप्तच्याच नागरिकांनी हातभार लावल्याचं सांगितलं. तेथील पुरातत्वं परिषदेचे महासचिव मोहम्मद इस्माइल खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार या थडग्यांच्या अंतर्गत भागात करण्यात आलेल्या लिखाणानुसार थडगी नेमकी कोणाची आहेत आणि त्या व्यक्तींचं वास्तव्य नेमकं कुठं होतं याची माहिती मिळाली आहे. आता पुढं, या थडग्यांच्या स्वच्छतेसह उर्वरित पुराव्यांचा अभ्यास केला जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. 

ही थडगी कोणाची? त्या व्यक्तींची नावं पाहाच... 

इजिप्तमध्ये नव्या संशोधनादरम्यान सापडलेलं पहिल थडगं अमुन-एम-इपेटची असून, ही व्यक्तीर रामेसीड काळातील असल्याचं सांगितलं जातं. मंदिर किंवा त्याच्याशी संबंधित ठिकाणी ही व्यक्ती काम करत असल्याची शक्यता असून, थडग्यामध्ये दिसणारी अनेक दृश्य नष्ट झाली आहेत. मात्र सामान वाहणारा आणि एक आचारी अशी चित्र मात्र तिथं दिसत आहेत. दुसरं थडकं बाकीचं असून त्यांचं वास्तव्य 18 व्या राजवटीचील असल्याचं सांगितलं जातं. ही व्यक्ती खाद्यभांडाराच्या पाहणीचं काम पाहत असल्याचं म्हटलं जातं. तिसरं थडगंसुद्धा याच कालखंडातील असल्याचं म्हटलं जातं. 

हेसुद्धा वाचा : हिंद महासागराखाली सापडलं हडप्पाहून प्राचीन समाधीस्त शहर; जादुई ठिकाण पाहून संशोधकही झाले होते अवाक्

 

अमुन-एम-इपेटच्या थडग्यामध्ये एक लहानसं अंगण, प्रवेशद्वार आणि एक चौकोनी सभागृह असून त्याच्या शेवटी एक तुटलेली भींतही असल्याची माहिती लक्सर पुरातत्त्वं विभागानं दिली आहे. इतर थडग्यांमध्ये एक मोठा अरुंद रस्ता, अंगण, प्रवेशद्वार अशी दृश्य पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला समोर आलेली ही दृश्य अतिशय महत्त्वाच्या माहितीवर उजेट टाकत असून, आता पुढं त्यासंदर्भात नेमकी कोणती माहिती जगासमोर उघड होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल असंच पुरातत्त्वं विभागाचं मत. 

Read More