Marathi News> विश्व
Advertisement

Unique Proposal : रांगेत उभ्या असलेल्या तरुणीला प्रपोज, रिप्लाय पाहून सगळेच हैराण

प्रपोज करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल.

Unique Proposal : रांगेत उभ्या असलेल्या तरुणीला प्रपोज, रिप्लाय पाहून सगळेच हैराण

Video Viral On Social Media : सोशल मीडियावर सध्या एका प्रपोजचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये एका मुलीला प्रपोज करून मुलगा केवळ मुलीच्या रागाचा बळी ठरत नाही, तर तिचा नकारही सहन करावा लागतो.

गुडघ्यावर बसून प्रपोज

एका तरुणाने मोठ्या अपेक्षेने गुडघे टेकून फूड रेस्टॉरंटच्या लांबलचक रांगेत उभ्या असलेल्या मुलीला प्रपोज केले. एवढेच नाही तर या तरुणाच्या हातात अंगठीही होती. हे ऐकून तुम्हालाही हा किस्सा एखाद्या रोमँटिक सीनपेक्षा कमी वाटत नसेल. पण या सीनच्या आनंददायी शेवटाची कल्पना करण्यापूर्वी तुम्ही हा व्हायरल व्हिडिओ जरूर पाहावा.

मुलीची प्रतिक्रिया व्हायरल 

या प्रपोजवर मुलीच्या प्रतिक्रियेने काही क्षणांतच या रोमँटिक क्षणाचे रूपांतर कॉमेडीमध्ये झाले. तरुणाच्या प्रपोजवर तरुणी त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि तिथून निघून गेली. या संपूर्ण प्रकरणाने मुलाची घोर निराशा झाली आहे. 'द सन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण दक्षिण आफ्रिकेतील असून ही संपूर्ण कथा मॅकडोनल्डच्या रेस्टॉरंटमधील आहे.

हा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर ती तात्काळ तेथून निघून गेली, मात्र तब्बल तीन मिनिटे तो तरुण तिथेच राहिला. दरम्यान, तेथे उपस्थित लोकांनीही तरुणीला प्रपोज स्वीकारण्यासाठी चिअर्स केलं. पण त्याचा काहीही उपयोग नाही झाली.

Read More