Marathi News> विश्व
Advertisement

Pilot च्या एका चुकीमुळं U-Trun घेऊन 2 तासांनी विमान जिथून उडालं तिथंच परतलं; प्रवाशांना 6 तासांचा मनस्ताप

Flight Turns Around After Pilot Does This Mistake: यासंदर्भातील माहिती खरी असल्याचं विमान कंपनीनेही स्पष्ट केलं आहे. त्यांनी प्रवाशांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

Pilot च्या एका चुकीमुळं U-Trun घेऊन 2 तासांनी विमान जिथून उडालं तिथंच परतलं; प्रवाशांना 6 तासांचा मनस्ताप

Flight Turns Around After Pilot Does This Mistake: आतापर्यंत तुम्ही खराब हवामानामुळे, तांत्रिक बिघाडामुळे अथवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याने विमानाचं उड्डाण उशीराने झाल्याच्या बातम्या वाचल्या असतील. मात्र अमेरिकेमध्ये एका फारच वेगळ्या कारणामुळे विमानाचं उड्डाण जवळपास सहा तास उशीराने झालं. हवाई क्षेत्राच्या इतिहासामध्ये कदाचित असं पाहिल्यांदाच घडल्याचंही अनेकांनी हा सारा प्रकार समोर आल्यानंतर म्हटलं आहे. ज्या विमान कंपनीच्या विमानाला सहा तास उशीर झाला तिचं नाव आहे युनायटेड एअरलाइन्स! नेमकं घडलं काय आणि हे विमान सगळं काही ठीक असताना सहा तास उशीरा का आकाशात झेपावलं जाणून घेऊयात...

कुठून कुठे जात होतं हे विमान?

'युनायटेड एअरलाइन्स'च्या लॉस एंजलिस ते शांघाईदरम्यान प्रवासी वाहतुक करणाऱ्या विमानाबरोबर हा सारा प्रकार घडला, अशी माहिती सीएनएनने दिलेल्या वृत्तातून समोर आली आहे. बोईंग 787 ड्रीमलायनर प्रकारच्या या अवाढव्य विमानामध्ये 257 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स होते. शनिवारी दुपरी 2 वाजता या विमानाने उड्डाण घेतलं. मात्र विमानाने उड्डाण केल्यानंतर दोन तासांनी विमान माघारी फिरलं आणि ते यूटर्न घेऊन सॅनफ्राइन्सिकोच्या विमानतळावर सायंकाळी 5 वाजता उतरलं. मात्र आता असं का झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासंदर्भात युनायटेड एअरलाइन्सने एक निवेदन जारी केलं आहे.

कंपनीने दिली स्पष्टीकरण

'युनायटेड एअरलाइन्स'ने खरोखरच विमान परतल्याची माहिती खरी असल्याचं म्हटलं आहे. "वैमानिकाकडे त्याचा पासपोर्ट नव्हता," असं कंपनीने या लॅण्डींगबद्दल माहिती देताना म्हटलं आहे. या विमानामध्ये पर्यायी राखीव वैमानिक नेमण्यात आला. अडकून पडलेल्या प्रवाशांना खाण्याचे कुपन्स वाटण्यात आले. त्यांना आवश्यक ती नुकसानभरपाई देण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे. रिशेड्यूल केलेलं युनायटेड एअरलाइन्सचं पुढचं विमान रात्री 9 वाजता निघालं. हे विमान शांघाई विमानतळावर नियोजित वेळापेक्षा सहा तास उशीराने पोहोचलं.

अनेकांच्या कनेक्टेड फ्लाइटही चुकल्या

वैमानिकाने अगदी स्वत:वर वैतागून प्रवाशांना इंटरनल टेलिकॉम सर्व्हिसवरुन, 'मी पासपोर्ट विसरल्याने विमान माघारी फिरवत आहोत," अशी घोषणा केल्याचं विमानातील प्रवाशांनी सांगितलं. अनेक प्रवाशांना कंपनीने या गोंधळानंतर जेवणाचे कुपन्स दिल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. मात्र अनेकांनी हा गोंधळ झालाच कसा असा सवाल करत टीकेची झोड उठवली आहे. या विमानाला उशीर झाल्याने पुढे कनेक्टेड फ्लाइटने जाणाऱ्यांना अडकून पडावं लागलं. या जोडून असलेल्या विमानासंदर्भातही कंपनीने विशेष सोय उपलब्ध करुन प्रवाशांना पुढील प्रवासाठी मोकळं केलं. मात्र वैमानिक पासपोर्ट विसल्याने कादाचित पहिल्यांदाच अशाप्रकारे संपूर्ण विमान मागे फिरवण्यात आल्याची घटना घडल्याची जोरदार चर्चा आहे.

Read More