Marathi News> विश्व
Advertisement

अमेरिकेतील सिनसिनाटीमध्ये विविध ठिकाणी गोळीबार; ८ मृत्यू

सिनसिनाटी शहर गोळीबाराच्या घटनांनी हादरलं...

अमेरिकेतील सिनसिनाटीमध्ये विविध ठिकाणी गोळीबार; ८ मृत्यू

सिनसिनाटी : अमेरिकेतील ओहिओ प्रांतातील सिनसिनाटी शहर गोळीबाराच्या घटनांनी हादरुन गेलं आहे. रविवारी शहारात अनेक ठिकाणी झालेल्या गोळीबारात 18 जण जखमी झाले असून, त्यापैकी 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तीन विविध ठिकाणी एक ते दिड तासांमध्ये गोळीबाराच्या तीन घटना घडल्या. 

ओवर-द-रिने Over-the-Rhine भागात गोळीबाराच्या घटनेत 10 लोक जखमी झाले, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. दुसरीकडे वॉलनट हिल्स भागातही गोळीबार झाला, तेथे 3 जण जखमी झाले. त्याशिवाय एवॉन्डेल भागातही 4 जणांवर गोळीबार करण्यात आला. 

स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, या तीनही ठिकाणांवरील घटना 60 ते 90 मिनिटांमध्ये घडल्या आहेत. पोलिसांनुसार, या तीनही घटनांच्या एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचं दिसत असून तीनही घटनांमागे वेगळी-वेगळी कारणं असण्याची शक्यता आहे. मात्र या घटना भयानक आणि दु:खद असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

 

Read More