Marathi News> विश्व
Advertisement

परदेशात शिकणारी सातारची नीलम कोमात, तरीही पालकांना व्हिसा मिळेना! आता केंद्र सरकारकडे दाद

US Accident: अमेरिकेत जखमी झालेल्या आणि मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

परदेशात शिकणारी सातारची नीलम कोमात, तरीही पालकांना व्हिसा मिळेना! आता केंद्र सरकारकडे दाद

US Accident: अमेरिकेत दुर्घटनाग्रस्त झालेली भारतीय विद्यार्थीनी कोमामध्ये गेली आहे. नीलम शिंदे असे तिचे नाव असून सातरला राहणाऱ्या तिच्या पालकांना लेकीला भेटण्यासाठी अमेरिकेला जायचय पण विविध मार्गांनी प्रयत्न करुनही त्यांना व्हीसा मिळत नाहीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी हस्तक्षेप केलाय.

आयसीयूमध्ये उपचार सुरु

अमेरिकेत जखमी झालेल्या आणि मरणाच्या दारात असलेल्या मुलीला भेटण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मेडिकल इमर्जन्सी व्हिसा मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. साताऱ्यातील उंब्रज गावातील नीलम शिंदे या 35 वर्षीय विद्यार्थिनीचा अमेरिकेत गेल्या 11 दिवसापूर्वी अपघात झाला. तिच्यावर अमेरिकेत आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र मरणाच्या दारात असताना तिच्याजवळ जाण्यासाठी तिच्या पालकांना भारतातून व्हिसा मिळत नाही

'तोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही'

नीलमचा 14 फेब्रुवारी 2024 रोजी अमेरिकेत व्यायामासाठी चालताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कार चालकाला पोलिसांनी पकडले आहे. मात्र रक्तातील नातेवाईक आल्याशिवाय गुन्हा दाखल होत नसल्याचे अमेरिकेतील पोलिस सांगतायत. 

मैत्रिणीकडून मिळतेय अपडेट

या अपघातात नीलम हिच्या दोन्ही हातांना आणि पायांना,डोक्याला दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने ती कोमात आहे.तिची रूममेट खुशी ही महाराष्ट्रातील असून तिच्याकडून उंब्रजमधील पालकांना माहिती मिळत आहे. 

पासपोर्ट व्हिसा आँफिसमधून दाद मिळेना 

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून व्हिसासाठी संपर्क केला, मुंबईतील कुर्ला येथे पासपोर्ट व्हिसा आँफिसला पालक गेले तरीही यांना दाद मिळेना असं या मुलाच्या पालकांचे सांगणे आहे.

Read More