Marathi News> विश्व
Advertisement

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री! इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर केला हल्ला

Trump announces US strikes on Iran: अमेरिकेने इराणविरुद्ध युद्ध पुकारून मोठा हल्ला केला आहे. जमिनीखाली शेकडो फूट उंचावर बांधलेले अणुऊर्जा प्रकल्प त्यांनी उद्ध्वस्त केले आहेत. याबद्दल स्वतः ट्रम्प यांनी माहिती दिली आहे.   

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेची एन्ट्री! इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर केला हल्ला

US attacks Iran: इस्रायल-इराण युद्धाच्या दहाव्या दिवशी अमेरिकेने अखेर हल्ला केला आहे. मध्यपूर्वेत युद्धाचा धोका वाढला असून, अमेरिकेने अखेर ईरानवर थेट हल्ला (us enters war) चढवला आहे. इजरायल-ईरान संघर्षाच्या दहाव्या दिवशी अमेरिकेने कारवाई करत फोरडो, नातांज आणि इस्फहान या ईरानच्या तीन अत्यंत संवेदनशील अणु संयंत्रांवर हवाई हल्ला केला. हे संयंत्रं जमिनीच्या शेकडो फूट खोल बंकरमध्ये उभारण्यात आले होते.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः गेल्या आठवड्यात सांगितले होते की ते एक आठवडा वाट पाहतील आणि नंतर इराणवर हल्ला करण्याचा विचार करतील. परंतु 21-22 जूनच्या मध्यरात्री ट्रम्प यांनी अनपेक्षितपणे इराणी अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करण्याचे आदेश दिले.

'बंकर बस्टर बॉम्ब्स'चा वापर 

अमेरिकेने या हल्ल्यासाठी 'बंकर बस्टर बॉम्ब्स' वापरले, जे खास खोल बंकरमध्ये लपवलेल्या टार्गेटसाठीच डिझाइन करण्यात आले आहेत. ट्रम्प प्रशासनाने गेल्या आठवड्यात या कारवाईचे संकेत दिले होते, पण 21-22 जूनच्या मध्यरात्री अचानकच ही कारवाई झाली. ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावरून हल्ल्याची माहिती दिली आहे.

अणु शस्त्र क्षमतेचा नाश करणे हाच उद्देश

या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे की, ईरानच्या अणु शस्त्र क्षमतेचा नाश करणे हाच उद्देश होता आणि तो साध्य झाला आहे. अमेरिकेच्या स्टील्थ बॉम्बर्सनी हे हल्ले पार पाडले असून, यामध्ये 30,000 पाउंड वजनाचे Massive Ordnance Penetrator (MOP) बॉम्ब वापरण्यात आले. हे बॉम्ब जवळपास 14 हजार किलो वजनाचे असून, जमिनीखालील संरचना उद्ध्वस्त करण्यात अत्यंत प्रभावी मानले जातात.

 

फोरडो संयंत्र हे कोम प्रांतातील डोंगराळ भागात, जमिनीच्या सुमारे 150 फूट खाली बांधण्यात आले होते. इथे हजारो सेंट्रीफ्यूज कार्यरत होते, जे वापरून अंदाजे 4 ते 6 अणुबॉम्ब तयार होऊ शकतात. इजरायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये हे टार्गेट अचूक साधणे अशक्य झाले होते, त्यामुळे अमेरिकेच्या या सहभागाने निर्णायक कारवाई घडून आली.

युद्ध अधिक व्यापक होण्याची शक्यता

या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे चार युद्धनौके गेल्या काही दिवसांत मध्यपूर्वेत दाखल झाल्या होत्या, ज्यात यूएसएस निमित्झ आणि यूएसएस कार्ल विन्सन यांचाही समावेश आहे. हे सर्व संकेत युद्ध अधिक व्यापक होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत.

Read More