Marathi News> विश्व
Advertisement

राष्ट्रपतींसमोरच Anchor ने पाय वर केले आणि...

विचित्र पद्धतीने पायांची हालचाल करताना दिसली. 

राष्ट्रपतींसमोरच Anchor ने पाय वर केले आणि...

मॉस्को : रशिया (Russia) चे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासमोल आलेली एक अमेरिकन पत्रकार सध्या कमालीची चर्चेत आली आहे. राष्ट्रपतींसोबत चर्चा करत असताना या अँकरने केलेल्या कृती पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. स्थानिक माध्यमांनी तर या अँकरच्या कृतीला अश्लीलतेचं नावंही दिलं. सीएनबीसीची हेडली गँबल मॉस्कोमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात समन्वयक म्हणून हजर राहिली होती. यावेळी पुतीन यांना प्रश्न विचारताना तिची वागणूक काही ठीक दिसली नाही. 

एनर्जी फोरमच्या एका कार्यक्रमात ज्यावेळी पुतीन या अँकरनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते, त्यावेळी गँबल विचित्र पद्धतीने पायांची हालचाल करताना दिसली. अनेकदा तर तिनं राष्ट्रपतींकडेच पाय केले. इतक्यावरच न थांबता तिनं जीभ बाहेर काढूनही विचित्र इशारे करण्यास सुरुवात केली. तिच्या या सर्व कृती अश्लील असल्याचा सूर अनेकांनी आळवला. 

fallbacks

fallbacks

थेट राष्ट्रपतींसमोरच अशा हालचाली आणि कृती करणाऱ्या या अँकरकडून किंवा सीएनबीसीकडून मात्र या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, हेडलीनं सोशल मीडियावरवृत्तपत्रांमध्ये छापलेला तिचा एक फोटो शेअर करत 'माय बेस्ट अँगल' असं कॅप्शन त्याला दिलं. तिची ही पोस्ट आणि त्यानंतर सुरु झालेल्या चर्चा पाहता आता या प्रकरणी पुढे कोणतं नवं वळण येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

Read More