Donald Tump announce Tarrif on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1ऑगस्टपासून भारतावर 25 टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. एकीकडे संसदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमध्ये युद्दबंदी केल्याच्या दाव्यावरुन केंद्र सरकारला घेरलं जात असतानाच ही घोषणा झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला होता की नव्हता हे नरेंद्र मोदींनी जाहीर करावं अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धक्का दिला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र असला तरी, गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यवसाय केला आहे. कारण त्यांचे कर जगातील सर्वाधिक करांपैकी आहेत. त्यांच्याकडे सर्वात कठीण आणि वाईट गैर-मौद्रिक व्यापार अडथळे आहेत".
US President Donald Trump announces 25% tariffs on India starting August 1st.
— ANI (@ANI) July 30, 2025
Posts, "Remember, while India is our friend, we have, over the years, done relatively little business with them because their Tariffs are far too high, among the highest in the World, and they have the… pic.twitter.com/eqVj981lGD
पुढे त्यांनी म्हटलं आहे की, "भारताने नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खरेदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे ऊर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाने युक्रेनमध्ये होणारी हत्या थांबवावी असं वाटते. सर्व गोष्टी चांगल्या नाहीत. म्हणून भारत 1 ऑगस्टपासून 25 टक्के कर आणि वरील दंड भरेल. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद!".
आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत, भारताची अमेरिकेला होणारी निर्यात 22.8 टक्क्यांनी वाढून 25.51 अब्ज डॉलर्स झाली, तर आयात 11.68 टक्क्यांनी वाढून 12.86 अब्ज डॉलर्स झाली.
भाजप खासदार प्रवीण खंडेलवाल म्हणाले, "भारत सरकार निश्चितच यावर काही पावलं उचलेल. भारत सरकार अमेरिकन प्रशासनाशीही बोलू शकते. या निर्णयानंतर वस्तू निश्चितच महाग होतील. त्याचा बाजारावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करावा लागेल." ते पुढे म्हणाले, "हे दुर्दैवी आहे की शुल्क लादण्यात आले आहे. मला आशा आहे की ट्रम्प प्रशासनाला लवकरच हे लक्षात येईल आणि ते हा निर्णय मागे घेतील."