Funny Viral News: आयुष्यात प्रेम मिळणं हीदेखील मोठी गोष्ट आहे. काहींना ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मिळतं. तर काहींना ते मिळत नाही. आजच्या डिजिटल युगात डेटिंगसाठी इंस्टाग्राम डीएम, टिंडर, बंबल यासारखी अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. पण तरीही अमेरिकेतील न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये सिंगल लोकांना जोडीदार शोधणे म्हणजे डोक्याला ताप ठरतोय. पूर्वीप्रमाणे आता डेटिंगचं गणित जुळणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत न्यूयॉर्कमधील डेटिंगच्या जगात एक अनोखा आणि विचित्र ट्रेंड समोर आला आहे, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल! असा प्रकार तुम्ही याआधी कधी ऐकला नसेल. तेपण महिलांकडून हा प्रकार होतोय, यावरही तुमचा विश्वास बसणार नाही.
न्यूयॉर्क पोस्टच्या एका अहवालानुसार, काही अविवाहित मुली आता प्रेम मिळवण्यासाठी चक्क रेस्टॉरंटमधून सलाड चोरण्याचा मार्ग निवडतायत. काय आहे हा सलाड चोरीचा प्रकार? जाणून घेऊया.
न्यूयॉर्कच्या मिडटाउन मॅनहॅटन भागात दुपारच्या जेवणाच्या वेळी काही मुली जाणीवपूर्वक फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुषांच्या ऑर्डर केलेल्या सलाडवर डल्ला मारतात. या ऑर्डरवर सहसा ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं असतं. सलाड उचलल्यानंतर या मुली लिंक्डइनवर त्या व्यक्तीचा शोध घेतात आणि त्याला मेसेज पाठवतात. मेसेज असा असतो, "हाय, सॉरी! मला वाटतं मी चुकून तुमचं सलाड घेतलं. तुम्हाला हवं तर मी तुमच्यासाठी नवीन सलाड खरेदी करू शकते!" असा मेसेज पाठवून त्या संभाषणाला सुरुवात करतात. ही युक्ती आहे ना गजब!सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ट्रेंडहा अनोखा आणि मजेदार ट्रेंड सोशल मीडिया युजर निकोल ऑर (@nicoleee461) ने समोर आणलाय.
तिने सांगितलं की, न्यूयॉर्कमध्ये डेटिंगचं मार्केट इतकं कठीण झालंय की, मुलींना प्रेमाचा शोध घेण्यासाठी सलाड चोरण्यासारखे अनोखे मार्ग वापरावे लागतायत. निकोलच्या मते, हा प्रकार म्हणजे डेटिंगच्या किचकट जगात संभाषण सुर सुरू करण्याचा एक नवा फंडा आहे. आतापर्यंत असं कोणतंही ठोस उदाहरण समोर आलेलं नाही, जिथे या सलाड चोरीच्या युक्तीमुळे खरोखरच प्रेमसंबंध जुळले असतील. पण तरीही हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. लोकांना ही आयडिया इतकी आवडली आहे की, त्याची चर्चा सर्वत्र होतेय.
Dating in NYC has gotten so bad that girls are stealing lunch orders from finance bros and stalking them on LinkedIn pic.twitter.com/6vtsRdhLV4
— Boring_Business (@BoringBiz_) July 13, 2025
न्यूयॉर्कसारख्या शहरात डेटिंगचं आव्हान वाढत चाललंय. पारंपरिक पद्धती आणि आधुनिक अॅप्सद्वारे जोडीदार शोधणं अवघड झाल्याने काही मुलींनी हा नवा मार्ग शोधला आहे. सलाड चोरीच्या या युक्तीमागे लिंक्डइनचा वापर करून त्या व्यक्तीशी संपर्क साधणं आणि त्याच्याशी गप्पा मारण्याचा हेतू आहे. हा प्रकार जरी मजेशीर आणि क्रिएटीव्ह वाटत असला, तरी यामुळे खरोखरच प्रेम मिळतं का?, याबाबत अजूनही शंका आहे. पण या अनोख्या आयडियाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. लोक या ट्रेंडबद्दल बोलत आहेत. मिम्स बनवत आहेत आणि हसत-खेळत या नव्या डेटिंग स्ट्रॅटेजीची चर्चा करत आहेत.
न्यूयॉर्कच्या डेटिंग विश्वात एक नवा सलाड चोरीचा ट्रेंड न्यूयॉर्कच्या डेटिंग विश्वात एक मजेदार आणि अनपेक्षित ट्विस्ट घेऊन आलाय. यामुळे खरं प्रेम मिळाल्याची उदाहरणं समोर आली नसली, तरी या युक्तीने लोकांचं मनोरंजन तर नक्कीच केलंय. कदाचित भविष्यात यामुळे कुणाचं तरी प्रेम जुळेल पण तोपर्यंत हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होत राहणार हे नक्की!