केप केनेवेरल, फ्लोरिडा : महाराष्ट्रात निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी सध्या या क्षणाला एक ऐतिहासिक घडामोड आपल्या डोक्यावर अवकाशात सुरू आहे. नासाच्या पुढाकारानं महिला अंतराळवीर स्पेस वॉक करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाची दुरुस्ती सध्या सुरू आहे. स्पेस वॉक करणाऱ्या सर्व महिला अंतराळवीर आहेत हे विशेष...
आत्तापर्यंत झालेल्या ४२० स्पेस वॉकमध्ये पुरुषांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे सहभाग होता. परंतु, ४२१ वा स्पेस वॉक एक इतिहास आपल्या नावावर नोंदवणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच महिलांचा एक चमू स्पेस वॉक करत आह.
LIVE NOW: Tune in to watch the first #AllWomanSpacewalk in human history!
— NASA (@NASA) October 18, 2019
Starting at approximately 7:50am ET, @Astro_Christina & @Astro_Jessica venture into the vacuum of space to replace a failed power controller. Watch: https://t.co/2SIb9YXlRh
नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोच आणि जेसिका मीर नवा इतिहास लिहित स्पेस वॉक करत आहेत. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात उपस्थित सर्व चार पुरुष आतच राहतील. तर कोच आणि मीर तुटलेला बॅटरी चार्जर बदलण्यासाठी अंतराळ केंद्रातून बाहेर येऊन अंतराळात चालणार आहेत.
गेल्या आठवड्यात कोच आणि चालक दलाच्या एका पुरुष सदस्यानं अंतराळ केंद्राच्या बाहेर नवी बॅटरी लावली तेव्हाच बॅटरी चार्जर बिघडला होता. नासानं ही समस्या सोडवण्यासाठी बॅटरी बदलण्याचं काम स्थगित केलं आणि महिलांच्या नियोजित 'स्पेस वॉक'वर लक्ष केंद्रीत केलं.