Marathi News> विश्व
Advertisement

बाई.. हा काय प्रकार! 6 बॉयफ्रेंडनी मिळून तरुणीला 7व्या सोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पुढे जे घडलं ते...

Viral Video : ढाकामधील एका तरुणीला 6 बॉयफ्रेंडनी हॉटेलमध्ये सातव्या बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

बाई.. हा काय प्रकार! 6 बॉयफ्रेंडनी मिळून तरुणीला 7व्या सोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पुढे जे घडलं ते...

Viral Video: आजकाल सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सध्याचे युग डिजिटल असल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच डेटिंग अॅप्सच्या मदतीने अनेक तरुणी या मुलांना आपल्या जाळ्यात अडकवताना दिसत आहेत. परंतु, जेव्हा एखाद्या मुलीचा असा खोटारडे पणा उघडकीस येतो. त्या काय होते याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. 

दरम्यान, असाच एक प्रकार बांगलादेशातील ढाका येथे घडला आहे. सध्या  याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं व्हायरल व्हिडीओमध्ये काय? पाहूयात सविस्तर 

व्हायरल व्हिडीओमध्ये काय? 

सोशल मीडियावर बांगलादेशातील ढाका येथील एका तरुणीचा हॉटेलमधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या सातवा बॉयफ्रेंडसोबत दिसत आहे. सातव्या बॉयफ्रेंडसोबतच तिचे अजून 6 बॉयफ्रेंड आहेत. ती सातव्या बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये दिसत आहे. त्यावेळी तिचा बॉयफ्रेंड तिचे डोळे झाकतो. त्यावेळी त्या तरुणीला वाटते की तो तिला काही तरी खास सरप्राईज देत आहे. त्यामुळे ती देखील खूप उत्सुक असते. ती देखील डोळे बंद करून बसते. 

त्याचवेळी तिचे सहा बॉयफ्रेंड त्याच हॉटेलमध्ये एकापाठोपाठ आतमध्ये प्रवेश करतात. ही तरुणी एकाच वेळी सात जणांना डेट करत होती. हे सहा बॉयफ्रेंड आतमध्ये येताच ती डोळे उघडते. त्यानंतर तिला मोठा धक्का बसतो. ती रागात हात टेबलवर आदळते आणि रडायला लागते. त्याच वेळी तिचे सहा बॉयफ्रेंड तिला असं का केलं विचारतात. त्याच वेळी तिथे लोक देखील हे पाहून हैराण होतात. 

व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव 

सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर तुफान कमेंट्स करत आहेत. या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांमध्ये देखील वाद सुरु झाला आहे. काही चाहत्यांनी या तरुणीला वाईट म्हटलं आहे तर काही नेटकऱ्यांनी तिचा तो वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या बॉयफ्रेंडने बाकीच्या 6 बॉयफ्रेंडला हॉटेलमध्ये बोलावलं  त्याचा आदर करायला हवा असं काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तर काहींनी तरुणीला जबाबदार धरत एकाच वेळी सहा जणांचे हृदय तोडल्याचा आरोप केला आहे. या डेटिंग अॅपमुळे पुढील पिढी मोठ्या संकटात सापडणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे. या अॅपमुळे मोठ्या प्रमाणात अशा घटना वाढल्या असून प्रत्येकाने सावध राहून मैत्री केली पाहिजे असं देखील म्हटलं जात आहे. 

Read More