Marathi News> विश्व
Advertisement

Indonesia Earthquake : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं, पाहा Video

Indonesia Earthquake Video : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं पाहून अंगावर शहारा येतो.   

Indonesia Earthquake : आक्रोश, हाहाकार..; महाप्रयलंकारी भूकंपानंतर इंडोनेशियातील भयावह दृश्यं, पाहा Video

Indonesia Earthquake Video :  इंडोनेशियामध्ये (Indonesia) राजधानी असणाऱ्या जकार्तामध्ये (Jakarta) सोमवारी आलेल्या महाप्रयलंकारी भूकंपानंतर एका क्षणात होत्याचं नव्हतं. सर्व शहरात आक्रोश, किंकाळ्या आणि मृतांचा खच पाहिला मिळतोय. या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत 268 जणांचा मृत्यू (Indonesia Earthquake death toll) झाला आहे.  तर  151 जण लोक अजून बेपत्ता आहे. तर जवळपास हजार लोकांना गंभीर दुखापत झाली आहे. 

थरकाप उडवणारे दृश्यं 

भूकंपाच्या घटनेदरम्यानचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. एका बिल्डिंगमध्ये भूकंप आल्यानंतर तरुणींची धावपळ, डोळ्यासमोर पत्तासारखं कोसळणारी घरं, दुकानं, शांतपणे बागेत जेवत असताना जेव्हा जमीन हादरायला लागते. घरापासून बाजारापर्यंत ऑफिसपासून शाळा कॉलेजपर्यंत एका क्षणात भूकंपानं सगळं गिळंकृत केलं. (video indonesia earthquake jakarta death toll rises 268 people)

भूकंपाचा केंद्रबिंदू 

BNBP नं दिलेल्या माहितीनुसार राजधानी जकार्तामध्ये जवळपास 75 किमी (45 मैल) दूर भूकंप आल्याचं सांगण्यात आलं. यामध्ये 5000 हून अधिक नागरिक विस्थापित झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - Earthquake in Palghar  : 'हा' जिल्हा पुन्हा एकदा हादरला; अनेक भागांत भूकंपाचे धक्क्यामुळे नागरिकांमध्ये भीती

इंजोनेशियामध्ये विध्वंस करणाऱ्या भूकंपांनी आतापर्यंत कायम हाहाकार माजवसा आहे. 2004 मध्ये उत्तर इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेटावर 9.1 तीव्रतेचा भूकंप आला होता. या संकटामुळं 14  देश प्रभावित झाले होते. 

Read More