Marathi News> विश्व
Advertisement

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकावला

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकवण्यात आल्याची घटना घडली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकावला

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर बूट भिरकवण्यात आल्याची घटना घडली आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

लाहौरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात भाषण करण्यासाठी नवाज शरीफ पोहोचले होते त्यावेळी ही घटना घडली आहे.

आरोपी हा जामिया नीमियाचा माजी विद्यार्थी

आरोपी तरुण हा जामिया नीमियाचा माजी विद्यार्थी असून तहरिक-ए-लब्बैक या रसूल अल्लाह (TLYR)चा सदस्य आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका शाळेत आयोजित कार्यक्रमासाठी भाषण देण्यासाठी नवाज शरीफ पोहोचले होते त्या दरम्यान ही घटना घडली.

बचावाचा प्रयत्न मात्र...

'जिओ टीव्ही' ने दिलेल्या वृत्तानुसार, नवाज शरीफ भाषण देण्यासाठी मंचावर पोहोचले त्याच दरम्यान उपस्थित प्रेक्षकांमधील एकाने बूट भिरकावला. नवाज शरीफ यांनी या हल्ल्यातून वाचण्याचा प्रयत्न केला मात्र, बूट त्यांच्या छातीवर लागला.

बूट भिरकावल्यानंतर आरोपी तरुणाने मंचावर जात घोषणाबाजी सुरु केली. त्यावेळी उपस्थित सुरक्षारक्षकांनी आणि नागरिकांनी आरोपीला पकडलं. त्यानंतर नवाज शरीफ यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

Read More