शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.7.7 तीव्रतेच्या या भूकंपाने चीन आणि थायलंडमध्येही जमीन हादरली आहे. चीनच्या युनान प्रांतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपात जेव्हा चीनमधील रुग्णालयाची इमारत झुल्यासारखी हादरत होती, तेव्हा येथील परिचारिकांनी नवजात बालकांना वाचवण्यासाठी खूप संघर्ष केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, चिनी नर्स भूकंपाच्या धक्क्यामुळे बाळाच्या पाळण्या कोसळण्यापासून वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. एक नर्स नवजात बाळाला मांडीवर घेऊन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
युनान प्रांतातील रुईली येथील जिंगचेंग रुग्णालयाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. भूकंपाच्या वेळी परिचारिकांनी धाडस दाखवत नवजात बालकांना वाचवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. जेव्हा भूकंप झाला तेव्हा परिचारिकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळण्याऐवजी नवजात बालकांना वाचवण्याला प्राधान्य दिले. ती पाळणा हलू नये म्हणून धावत गेली आणि इमारत हादरत असतानाही तिने इनक्यूबेटरला धरून ठेवले.
Atouching moment during the tragedy:
— China in Pictures (@tongbingxue) March 28, 2025
The earthquake in Myanmar was felt in Ruili, Yunnan, China, where two nurses at Jingcheng Hospital's maternity center were seen shielding infants: pic.twitter.com/xDNqPAb9tt
युनानमधील जिंगचेंग रुग्णालयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे रुग्णालयाची इमारत हादरली असतानाही ज्या कामगारांनी पाळणे स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांचे खूप कौतुक केले जात आहे. सोशल मीडियावर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, 'परिचारिकांच्या धाडसाला सलाम. ते खूप भीतीदायक होते पण मला आनंद आहे की ती मुले ठीक आहेत. अनेकांनी परिचारिकांचे कौतुक केले आहे आणि त्यांना खरे हिरो म्हटले आहे.
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात 1644 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तीन हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे सर्वाधिक मृत्यू म्यानमारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मंडाले येथे झाले आहेत. हा भाग भूकंपाच्या केंद्रापासून सर्वात जवळ आहे. थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही बरेच नुकसान झाले आहे. येथे बांधकाम सुरू असलेली ३० मजली इमारत कोसळल्याने अनेक लोक अडकले.