Marathi News> विश्व
Advertisement

बिअर पिणारा उंट ठरला व्हायरल स्टार (व्हडिओ)

एक-दोन घोटात बिअरची अवघी बॉटल पिऊन फस्त करणारा हा उंट सध्या सोशल मीडियात हिरो ठरतोय. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ

बिअर पिणारा उंट ठरला व्हायरल स्टार (व्हडिओ)

मुंबई: जे जे इतरांपासून निराळे तेते सोशल मीडियाचे आवडते खाद्य ही व्हायरल घटनांची साधी व्याख्या. सध्या सोशल मीडियावर एक व्हडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणा व्यक्तिचा नाही. तर, तो आले एका उंडाचा. या उंटाची खासीयत अशी की, तो चक्क बिअर पितो. तेही चक्क बिअरची बॉटलच तोंडाला लाऊन. आश्चर्य वाटले ना? पण, हा व्हिडिओ पाहा आणि खात्री करून घ्या....

एक-दोन घोटात बिअरची अवघी बॉटल पिऊन फस्त करणारा हा उंट सध्या सोशल मीडियात हिरो ठरतोय. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. browncardigan नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर झालेला हा व्हिडिओ पाहणाऱ्याचे चांगलेच मनोरंजन करतो.

Read More