Marathi News> विश्व
Advertisement

Viral News : 3 मुलींची आई, नवऱ्याला पाहून लोक म्हणतात पिता; 13 वर्षांच्या मुलीचं काय आहे सत्य?

Viral News : तू 13 वर्षांची आणि तुला 3 मुलं, हा तुझा नवरा आहे की वडील? सोशल मीडियावर येणाऱ्या मेसेजमुळे ती त्रस्त झाली होती. लोक तिला तिचं खरं वय विचारत होते. अखेर तिने चुपी सोडली आणि सत्य सांगितलं. 

Viral News : 3 मुलींची आई, नवऱ्याला पाहून लोक म्हणतात पिता; 13 वर्षांच्या मुलीचं काय आहे सत्य?

Trending News : प्रेमात ना रंग ना वय ना धर्म ना समाज कसलही बंधन नसतं. सोशल मीडियावर एका तरुणीच्या वयावरुन चर्चा रंगली आहे. तिने ज्या व्यक्तीसोबत लग्न केलं तो तिचा वडील आहे का असं तिला वारंवार विचारलं जातं. त्यात या मुलीला 3 मुलंही आहेत आणि ती 13 वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात तीन मुलं आणि वडिलांच्या वया एवढा नवरा, काय आहे हे प्रकरण. तिच्या वयावरुन तिला कायम सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. तिला नेटकरी इतके मेसेज करतात की, त्रस्त झाली आहे. अखेर तिने 13 वर्षांचं गुपित उघड केलं आहे. (viral news 13 year old  women three children mother wife husband Users call him father trending news in google)

आणि तिने सत्य सांगितलं!

खरं तर महिलांना त्यांचा वयापेक्षा कायम तरुण दिसायचं असतं. त्या दोन तीन वर्ष कमीच आपलं वय सांगत असतात. पण या महिलेसाठी तिचं वय त्रासदायक ठरत आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, एका ऑनलाइन यूजरने तिला विचारलं की,  तू 13 वर्षांची दिसतंय. त्यावर तिने उत्तर दिलं की, हे पूर्णपणे चुकीचं असून मी 31 वर्षांची आहे. तिने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, मी आता 13 वर्षांची नसून 18 वर्षांपूर्वी मात्र होते. आता तर माझा मुलगी सात वर्षांनी 13 वर्षांचा होणार आहे. 

लिन या महिलेला तीन मुलं असून ती त्याचा वयापेक्षा खूप कमी असल्याची जाणवते. लोक तेव्हा अधिक धक्का बसतो जेव्हा ती नवऱ्यासोबत फोटो शेअर करते. हा फोटो पाहून नेटकरी तिच्या नवऱ्याला तिचे वडील समजतात. 

गेल्या 9 वर्षांपासून हे कपल सोबत सुखी संसार करत आहे. या दोघांच्या वयात फक्त तीन वर्षांचा अंतर आहे. एका यूजरने तिला विचारलं, तुला आणि तुझ्या नवऱ्याला लोक मुलगी आणि वडील समजतात का? त्यावर ती म्हणाली की, हो असं अनेक जण मला म्हणतात. आमच्यामध्ये वयाचं अंतर आहे. पण उंचीमध्ये खूप अंतर असलं तरी आम्ही सर्व सामान्य लग्न झालेल्या कपल सारखेच आहोत. तिची उंची खूप कमी असल्याने यूजर्स तिला 13 वर्षांची समजतात. नेटकऱ्यांचा प्रश्नांना कंटाळून तिने वयाचं सत्य सांगितलं आहे.

 

Read More