Marathi News> विश्व
Advertisement

पालक 10 वर्षांच्या लेकाला विमानतळावर सोडून फिरायला गेले, कारण ऐकून तळ पायातील आग मस्तकात जाईल

Viral News : एका पालकाने असं काही केलं की सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. आपल्या 10 वर्षांच्या मुलाला ते विमानतळावर एकटं सोडून फिरायला निघून गेले. यामागील कारण जाणून तुमच्याही तळ पायातील आग मस्तकात जाईल. 

पालक 10 वर्षांच्या लेकाला विमानतळावर सोडून फिरायला गेले, कारण ऐकून तळ पायातील आग मस्तकात जाईल

Viral News : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एका विमानतळावरील टर्मिनल कामगाराने एका पालकांच्या कृत्याबद्दल सांगितलं आहे. त्यांचं हे कृत्य ऐकून तुम्हाला धक्का बसेल. आई वडिलांसाठी त्यांचं मुल हे जीव की प्राण असतं. पालक मुलांना आपल्या डोळ्यासमोर एक सेकंदसाठी पण ओझर होऊ देत नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पालकांनी तर आपल्या 10 वर्षांच्या मुलाला विमानतळावर सोडून फिरायला निघून गेल्याचं म्हटलं आहे. यामागील कारण जाणून तर तुम्हाला संताप येईल. (viral news Barcelona airport parenting incident viral video on social media)

पालकांनी 10 वर्षांच्या मुलाला विमानतळावर काय सोडलं?

लिलियन नावाच्या एका टर्मिनल कामगाराने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, त्यांना एक 10 वर्षांचा मुलगा विमानतळावर एकटा दिसून आला. त्यांनी याबद्दल मग विमानतळ पोलिसांना कळवलं. पोलिसांनी विचारपूस आणि तपास केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. पालक फिरायला जाण्यासाठी आपल्या 10 वर्षांच्या मुला घेऊन बार्सिलोना विमानतळावर आले होते. विमानतळावर आलेल्या पालकांना कळलं की, त्यांच्या मुलाचा पासपोर्ट कालबाह्य (Expires) झालं होतं. त्यानंतर पालकांनी मुलाला विमानतळावर सोडून फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार पालकांनी त्या 10 वर्षांच्या मुलाची नातेवाईकाकडे राहण्याची व्यवस्था केली होती. पण विमान उडण्याची वेळ झाली होती, त्यामुळे पालक 10 वर्षांच्या मुलाला एकटं विमानतळावर सोडून निघून गेली. "त्याने त्यांना सांगितले की त्याचे पालक त्यांच्या मायदेशी सुट्टीवर जाण्यासाठी विमानात होते," असे लिलियनने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे, असे द सनने वृत्त दिलंय. 

"त्याच्या देशात पासपोर्टची मुदत संपली होती, त्यामुळे तो मुलगा स्पॅनिश पासपोर्ट घेऊन प्रवास करत होता पण स्पॅनिश पासपोर्टला व्हिसा हवा होता. त्यांच्याकडे व्हिसा नसल्याने त्यांनी मुलाला टर्मिनलवर सोडलं आणि एका नातेवाईकाला त्याला घेण्यासाठी बोलावलं," असं तिने पुढे सांगितलं. त्यानंतर विमानाच्या पायलटशी तातडीने संपर्क साधण्यात आला, ज्याने नंतर पुष्टी केली की पोलिसांनी त्याला कार पार्कमध्ये एका अल्पवयीन मुलाबद्दल माहिती दिली होती. अखेर, पालकांना शोधण्यात आले. "मी एक हवाई वाहतूक नियंत्रक आहे, आणि एक नियंत्रक म्हणून, मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या आहेत, परंतु हे पूर्णपणे अवास्तव आहे." 

"कागदपत्रांच्या अडचणींमुळे प्रवास करता येत नाही म्हणून पालक त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाला टर्मिनलवर कसे सोडू शकतात? ते नातेवाईकाला फोन करतात पण नातेवाईक अर्धा तास, सुमारे एक तास, सुमारे तीन तास घेतात आणि ते इतक्या शांतपणे विमान प्रवास करतात आणि मुलाला मागे सोडून जातात!" लिललियन म्हणाली. "त्यांना ते अगदी सामान्य वाटले. अर्थातच मला ते सामान्य वाटले नाही आणि पोलिसांनाही ते सामान्य वाटले नाही," ती म्हणाली.

लिलियनने म्हणाली की विमानतळ पोलिसांनी अखेर पालकांचे सामान विमानातून काढून टाकले आणि त्यांना चौकशीसाठी घटनास्थळी असलेल्या पोलीस ठाण्यात नेले. पालकांना औपचारिकपणे अटक करण्यात आली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान लिलियन पोस्ट केलेल्या व्हिडीओला 3,00,000 हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

 

Read More