Viral News: या जगात प्रत्येकाला सुंदर दिसायचे असते, पण ही इच्छा महिलांमध्ये अधिक प्रबळ असलेली पाहायला मिळते. ब्रिटनमधील एका महिलेने स्वतःला बाहुलीसारखे दिसण्यासाठी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केले. पण आपण आपल्या लूकमागे खूप काही गमावलंय असे तिला कालांतराने वाटू लागले. मग तिने तिचा लूक पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेतला आणि आता ती सामान्य दिसते. आणि स्वतःला पूर्वीपेक्षा जास्त सुंदर मानते.
ब्रिटनमधील बकिंगहॅमशायरची 36 वर्षीय ट्रेसी किस तिच्या सौंदर्यामुळे नाही तर ते सोडून देण्याच्या तिच्या निर्णयामुळे चर्चेत आहे. ती किशोरावस्थेपासूनच ब्युटी ट्रीटमेंट्स आणि कॉस्मेटिक सर्जरीसाठी वेडी होती. पण आता तिने तिच्या बहुतेक सर्जरीसाठी सुमारे सव्वा कोटी रुपये (£120000) खर्च केला. पण नंतर आयुष्यभर बोटॉक्स आणि फिलर्स वापरणार नाही असा निर्णय तिने घेतला.
ट्रेसीचा सौंदर्य प्रवास परीकथेसारखा नव्हता. गेल्या 20 वर्षांत तिने 5 वेळा स्तन शस्त्रक्रिया, हनुवटीचे लिपोसक्शन, पापण्या उचलण्याची शस्त्रक्रिया, नाकाची शस्त्रक्रिया, ब्राझिलियन बट लिफ्ट, लॅबियाप्लास्टी आणि दात सरळ करणे यासह इतर कॉस्मेटिक बदल केले आहेत. इतकेच नाही तर तिने 'परिपूर्ण' लूक ठेवण्यासाठी बोटॉक्स आणि फिलर्स तसेच अर्ध-कायमस्वरूपी मेकअप आणि पापण्यांचे विस्तार देखील वापरले.
सोशल मीडियावर तिचे 12 लाखांहून अधिक फॉलोअर्स होते पण वास्तविक जीवनात तिला टीका आणि टोमणे सहन करावे लागत होते. अनेक महिला तिच्याकडे संशयाने पाहत होत्या. ही आपल्या पतींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतेय, असे त्या महिलांना वाटायचे. 'सुपर-साइज्ड डोनट ब्रेस्ट"मुळे तिला शाळेत घेऊन जाताना किंवा मुलांसोबत समुद्रकिनाऱ्यावर जाताना विचित्र नजरांना सामोरे जावे लागायचे, असे ट्रेसी सांगते.
ऑगस्ट 2023 मध्ये ट्रेसीने पहिले पाऊल उचलले. ती तुर्कीला गेली आणि स्तन कमी करण्याची शस्त्रक्रिया £4500 खर्चाची झाली. तिच्या स्तनाचा आकार 32H वरून 32C पर्यंत आणला. त्यानंतर तिने चेहऱ्यावरील फिलर काढून टाकले. ज्यामध्ये हनुवटी, जबडा, नाक आणि ओठांना इंजेक्शन देणे याचा समावेश होता. मग तिने नियमित बोटॉक्स, केस आणि नखांच्या अपॉइंटमेंट्स कायमच्या रद्द केल्या.
'फक्त पापण्या आणि नखांवर आठवड्याला £60 खर्च करणे सोपे आहे. ती म्हणाली, 'पण जेव्हा तुम्ही केस, टॅनिंग, बोटॉक्स आणि फिलरचा खर्च जोडता तेव्हा महिन्याला शेकडो पौंड खर्च होतो. मी स्वतःला अशा प्रतिमेत साकारलंय जे माझ्या खऱ्या ओळखीपासून खूप दूर आहे, असे ती सांगते. आता मला मेकअपशिवाय अधिक आत्मविश्वास वाटतो, असे ती सांगते.