Marathi News> विश्व
Advertisement

VIRAL : लग्नाच्याच दिवशी नवरदेवाकडून होणाऱ्या पत्नीला घरचा आहेर, स्क्रिनवरच दाखवला 'तो' व्हिडिओ

पाठवणी झाली, पण कुणाची आणि कशी ते पाहाच, घटनेवरुन सोशल मीडियावरही वाद

VIRAL : लग्नाच्याच दिवशी नवरदेवाकडून होणाऱ्या पत्नीला घरचा आहेर, स्क्रिनवरच दाखवला 'तो' व्हिडिओ

Viral News : लग्न म्हणजे दोन जीवांचं मधुर मिलन, आयुष्यभराची साथ, साता जन्माची गाठ... लग्न म्हणजे पती आणि पत्नी दोघांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण. हा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी दोघांचाही प्रयत्न असतो. पण याच क्षण काही विपरीत घडलं तर. अशीच काहीशी एक विचित्र घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. (viral news groom exposes brides cheating)

भर लग्न सोहळ्यात सर्व नातेवाईकांसमोर पतीने आपल्या पत्नीचं धक्कादायक कृत्य उघड केलं. लग्नाच्या स्टेजवर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर पतीने पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओ होणारी पत्नी चक्क एका परपुरुषाबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत होती. धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावरही टाकला.

ही घटना चीनमधली आहे. नवविवाहित जोडप्याचं रिसेप्शन सुरु होतं. याचवेळी पतीने पत्नीचा तो व्हिडिओ स्क्रिनवर सुरु केला. यामुळे पत्नीबरोबरच उपस्थित सर्वांनाच मोठा धक्का बसला. या व्हिडिओत पत्नी ज्या पुरुषाबरोबर होती तो तिच्या सख्ख्या बहिणाचा नवरा असल्याचं समोर आलं.

व्हिडिओ पाहातच पत्नीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने रागाच्या भरात हातातला बुके पतीला फेकून मारला. त्यानंतर आरडा-ओरडा करत तीने तिथून काढता पाय घेतला.

पतीने हा व्हिडिओ टिक-टॉकवरही शेअर केला. तब्बल 60 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो कंमेट या व्हिडिओवर आल्या आहेत. कंमेटमध्ये अनेकांनी पतीची बाजू केली घेतली आहे. एका युजरने म्हटलंय, त्या पतीने केलेलं कृत्य अतिशय योग्य असून वेळेआधीच पत्नीचे असले प्रकार सर्वांसमोर आले.

एका युजरने म्हटलंय, हा व्हिडिओ लग्नाच्या आधी हाती तर त्या व्यक्तीने तिच्याशी लग्नच का केलं? लग्नासाठी इतका पैसा खर्च का केला? मिळालेल्या माहितीनुसार हे जोडपं लग्ना आधीपासून दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. 

Read More