Marathi News> विश्व
Advertisement

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Lottery Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात. यावर एका महिलेचाही विश्वास होता. पण त्याचा तिला फायदाच झाला.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे राहणाऱ्या एका महिलेचा विश्वास होता की तिच्या मुलाच्या हातातील खाज एक दिवस कुटुंबाला श्रीमंत करेल. आणि तेच झालं. महिलेचा मुलगा एके दिवशी ऑफिससाठी बाहेर गेला आणि तो परत आला तेव्हा तो करोडपती झाला होता. आता संपूर्ण कथा महिलेच्या मुलाने सांगितली आहे.

खाज सुटली तेव्हा लॉटरीचे तिकीट घेतले

माझी आई म्हणायची की जेव्हाही हाताला खाज येते तेव्हा हात खिशात टाकायला हवा, कदाचित यातून पैसे मिळतील. असे डोनाल्ड पिटमॅन नावाच्या तरुणाने सांगितले. 

दुसऱ्या क्षणाला बनला करोडपती

एके दिवशी तो ऑफिसला जात असताना त्याच्या हाताला खाज येत होती. त्याने खिशात हात टाकला. यानंतर वेव्स मार्ट अॅण्ड ग्रिलमधून रबी रेड 7s वरून लॉटरीचे तिकीट विकत घेतले. हे तिकीट स्क्रॅच केले आणि त्याचे डोळे पाणावले. कारण क्षणार्धातच तो 2 लाख डॉलर्स म्हणजेच 1 कोटी 65 लाख रुपयांचा मालक बनला होता.

संपूर्ण श्रेय आईला दिले

पिटमॅनने लक्षाधीश होण्याचे संपूर्ण श्रेय त्याच्या आईला दिले आहे. जेव्हा पिटमॅनने त्याच्या आईला लॉटरी जिंकल्याची बातमी दिली तेव्हा तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही. या रकमेचे पिटमॅन काय करणार हेही त्यांनी उघड केले आहे. हे पैसे तो डर्ट बाईक खरेदी, घराचे नूतनीकरण आणि खरेदीसाठी खर्च करणार आहे. याशिवाय एक भाग सेव्हिंग म्हणून बाजुला काढून ठेवणार आहे.

आईचे म्हणणे खरे ठरले

मला लॉटरीचे तिकीट घ्यायचे नव्हते. मी कामावर जात होतो. पण नंतर हाताला खाज सुटू लागली. आईने सांगितले होते ते आठवले. त्यामुळे खिशात हात ठेवला. त्यानंतर मी तिकीट काढले, ज्याने मी अचानक करोडपती झालो. आईचे म्हणणे खरे ठरले, असे पिटमॅनने सांगितले.

Read More