Marathi News> विश्व
Advertisement

बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...

Viral : लेकराला स्तनपान करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला पाहून लोक देऊ लागले भलते सल्ले; तिनं ऐकून घेतलं आणि मग...   

बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...

Viral News : काळ कितीही पुढे आला असला तरीही काही गोष्टी, किंबहुना अनेकांच्याच मनात काही गोष्टींविषयी असणाऱ्या समजुती आणि न्यूनगंड दूर करण्यात अद्यापही यश आलेलं नाही. स्तनपान हे त्यापैकीच एक. अतिशय नैसर्गित अशी ही प्रक्रिया, कृती असूनही एखाद्या महिलेला सार्वजनिक स्थळी स्तनपान करताना पाहून तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बऱ्याचदा बदलतो. याच अनुभवावरून Shayoon नावाच्या एका इन्फ्लुएन्सरनं तिच्यासोबत घडेलले प्रसंग आणि त्याला ती नेमकी कशी सामोरी गेली याविषयीची एक पोस्ट लिहिली. 

officialhumansofbombay च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिची ही पोस्ट आणि तिचे काही फोटो शेअर करण्यात आले. जिथं ती लेकराला ब्रेस्टफीड अर्थात स्तनपान करताना दिसत आहे. 'हे फारच चुकीचं आहे...', 'हे सर्व खासगी ठिकाणी (घरी) करा' असं लोक कायमच तिला सांगायचे. इतकंच नव्हे, तर संकुचित विचारसरणीच्या अनेकांनीच तिला सार्वजनिक ठिकाणाहून बाहेर पडण्यासही सांगितलं होतं. 

Shayoon च्या अनुभवानुसार एकदा तर रेस्तराँमधून तिला बाहेर जाण्यास सांगम्यात आलं. 'ज्या ठिकाणी इतरांची पोटं भरतात, जिथं जेवण मिळतं तिथं मला माझ्या बाळाला मात्र दूध पाजता आलं नाही. लोकांना लहान मुलं आवडतात. पण, त्यांना जन्म देण्याची किंवा स्तनपानाची वेळ येचे तेव्हा मात्र अनेकजण माघार घेतात', असं Shayoon म्हणाली. 

हेसुद्धा वाचा : दोन मराठी मुलींमुळं सर्वोच्च न्यायालयाकडून ऐतिहासिक निकाल; जात मुद्द्यावर इथुन पुढं.... 

 

कायमत अतिशय स्पष्टपणे आपली मतं मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या Shayoon नं एक अतिशय मोठं पाऊल उचललं. ती शूटवर असताना तिच्या पतीनं तिचा एक असा फोटो टीपला जिथं ती लेहंग्यामध्ये दिसत असून, बाळाला स्तानपान करत होती. हे फोटो पाहताक्षणी तिला सोशल मीडियावर शेअर करावेलसे वाटले. 'मला फोटो कोणाचं लक्ष वेधण्यासाठी नव्हे, तर माझं मत मांडण्यासाठी शेअर करायचे होते. मला ठाऊक होतं की हे मोठं पाऊल असेस. फोटो पोस्ट केल्यावर मी काहीच अपेक्षा ठेवली नव्हती, पण हा फोटो शएअर करताच अनेकांनीच या निर्णयाचं कौतुक आणि स्वागत केलं', असं शायून म्हणाली. हे 2024 सुरु असून, काही गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन सामान्य झालाच पाहिजे अशी गरज तिनं या पोस्टमधून व्यक्त केली. 

Read More