Python Video : सोशल मीडियावर (Social media) एक गोष्ट लक्षात आली आहे गेल्या काही महिन्यांमध्ये प्राण्यांचे व्हिडीओ (Video) तुफान व्हायरल (Viral) होतात. त्यातच सगळ्यात जास्त सापाचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. साप (snake), किंग कोब्रा (King Cobra) आणि अजगर (Python) यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसतात. साप म्हटलं की आपली हवा गुल होते. सध्या सोशल मीडियावर विशाल अशा अजगराचा व्हिडीओ Trending मध्ये आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक विशाल आणि भयानक असा अजगर एका घरात शिरला आहे. एवढंच नाही तर तो विशाल अजगर पायऱ्यांच्या बाजूला असलेल्या भिंतीवरून वरच्या मजल्यावर चढून जातो. या अजगराची लांबी पाहून नेटकऱ्यांचा थरकाप उडतो. इंटरनेटवर हा व्हिडीओ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. (viral video big python on Social media nmp)
To go up,
— Susanta Nanda (@susantananda3) October 17, 2022
One doesn’t need a staircase every time pic.twitter.com/UIix7uby89
हा व्हिडीओ भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुशांत नंदा (Susanta Nanda) यांनी ट्विटरवर (Twitter) शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'वर जाण्यासाठी प्रत्येक वेळी पायऱ्यांची गरज नाही.' 32 सेकंदाच्या या क्लिपला शेअर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत.